नवी दिल्ली (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – दक्षिणपूर्व ब्राझिलमध्ये अत्यंत भीषण दुर्घटना घडली आहे. धबधब्याच्या ठिकाणी पर्वताची भली मोठी कडा अचानक कोसळली आहे. या दुर्घटनेत तब्बल ७ जण ठार झाले आहेत. तर, २० जण जखमी आणि ३२ जण बेपत्ता झाले आहेत. या दुर्घटनेचा एक व्हिडिओ सध्या जगभरात प्रचंड व्हायरल झाला आहे.
दक्षिणपूर्व ब्राझिलमध्ये साओ पावलोच्या उत्तरेला फुर्नास लेक आहे. धबधब्यामुळे हे ठिकाण जगप्रसिद्ध आहे. याठिकाणी अत्यंत मोठी दुर्घटना घडली. या सरोवरामध्ये पर्यटक बोटिंगचा आनंद घेत असतात. शनिवार असंख्य पर्यटक येथे आले होते. त्याचवेळी पर्वताचा मोठा कडा (दगडी शिळा) अचानक कोसळली. ही कडा पाण्यात बोटिंग करणाऱ्या पर्यटकांवरच कोसळल्याने एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत ७ जण जागीच ठार झाले आहेत. तर, २० जण जखमी झाले आहेत. अद्यापही ३२ पर्यटकांचा शोध लागलेले नाही. बचावकार्य सुरू आहे. बेपत्ता असलेल्या सर्व जणांना जलसमाधी मिळाल्याचे बोलले जात आहे.
बघा या दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ
https://twitter.com/UrbanNathalia/status/1479941428436520961?s=20