इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तगडी स्टार कास्ट असल्याने ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका सुरुवातीपासूनच प्रसिद्धीच्या झोतात आहे. वेगळे कथानक, भरपूर ट्विस्ट, आणि वेगळ्या धाटणीची मालिका यामुळे प्रेक्षक या मालिकेवर भरभरून प्रेम करतात. म्हणूनच निर्मात्यांनी आटोपती घेतलेली मालिका पुन्हा लोकाग्रहास्तव सुरू करण्यात आली. एकीकडे नेहाची स्मृती गेलेली आहे तर दुसरीकडे यशची फरफट या गोंधळात आता मालिकेत नवी एंट्री होत आहे. समीरची बहीण मालिकेत येते आहे. त्यामुळे समीर आणि शेफालीच्या नात्यावर परिणाम होणत्याची चिन्हे आहेत.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे असे मोठ्या पडद्यावरील मोठे कलाकार आहेत. वेगळे कथानक असल्याने ही मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत यशाच्या शिखरावर पोहोचली. मालिकेत सगळे सुरळीत होत असतानाच नेहा आणि यशचा अपघात होऊन पुन्हा सगळे विस्कटले आहे. सध्या नेहा एका गुजराती घरात असून तिची स्मृती गेल्याचे दिसते. तर इकडे नेहा आता या जगात नाही या भ्रमात सगळे आहेत. समीर आणि शेफाली एका कॅफेमध्ये बसलेले असताना कॅफेच्या दाराबाहेर समीरला नेहा दिसते. अर्थात नेहाची आता स्मृती गेली असल्याने ती अनुष्का म्हणून वावरते आहे.
https://twitter.com/zeemarathi/status/1590965643762839552?s=20&t=FntxJcotOeDG7k0LmI2i3A
नेहाला समोर पाहून समीर मात्र पुरता गोंधळून जातो आणि तो तिला भेटण्यासाठी तिच्या मागोमाग जातो. इकडे शेफाली देखील समीरच्या अचानक जाण्याने गोंधळून जाते. मात्र त्याचवेळी समीरच्या फोनवर त्याच्या बहिणीचा फोन येतो आणि शेफाली तो कॉल घेते. या दोघींची भेट होते त्यावेळी शेफाली तिच्या आणि समीरच्या नात्याचा खुलासा करते. मात्र समीरची बहीण यावर नाराज होते आणि शेफालीने समीरला आपल्या जाळ्यात ओढले आहे, असे म्हणत ती शेफालीलाच धारेवर धरते. समीरच्या बहिणीची मालिकेत एंट्री झाल्याने समीर आणि शेफालीच्या नात्यात दुरावा येणार असल्याची चिन्ह आहेत.
माझ्या बहिणीला आपल्या नात्याबद्दल काहीच माहिती नाही, त्यामुळे ती तुझ्यावर चिडली अशी शेफालीची समजूत घालताना समीर दिसतो. मात्र यावेळी तो शैफालीला मला नेहा दिसली असेही आवर्जून सांगतो. ती नेहाच होती की अजून कुणी हे समीरला देखील माहित नसल्याने तो गोंधळात आहे. आता हा नवा ट्विस्ट मालिकेला कोणत्या वळणावर नेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
https://twitter.com/zeemarathi/status/1590668089854554112?s=20&t=FntxJcotOeDG7k0LmI2i3A
समीरची बहिण म्हणून अभिनेत्री योगिनी पोफळे या मालिकेत एंट्री करणार आहे. योगिनी हिने रंगभूमीवर काम केले असून अनेक मालिकांमध्ये तिने काम केले आहे. तर ‘लागीर झालं जी’ या प्रसिद्ध मालिकेत तिने भय्यासाहेब यांच्या बहिणीची भूमिका केली होती. त्यांच्या अभिनयाची जादू या मालिकेत देखील चालेलच पण थोडीशी बालिश असलेली शेफाली समीरच्या बहिणीला कसं जिंकेल, समीर आपल्या बहिणीला मनवू शकेल का? नेहाला जुनं आठवणार का? शेफाली – समीरचं नातं टिकेल का असे अनेक प्रश्न उपस्थित झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे.
https://twitter.com/zeemarathi/status/1590279276854755328?s=20&t=FntxJcotOeDG7k0LmI2i3A
Majhi Tujhi Reshimgath TV Serial New Twist
Marathi Entertainment Zee Marathi