रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत हा कलाकार घेणार तूर्त ब्रेक; जाणार लाँग टूरवर

by Gautam Sancheti
जुलै 4, 2022 | 8:37 pm
in मनोरंजन
0
majhi tujhi reshim gath

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या टीव्ही वरील अनेक वाहिन्यांवर वेगवेगळ्या मालिका गाजत आहेत, परंतु त्यात काही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतात. त्यापैकीच एक म्हणजे झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका होय. सध्या ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर, आनंद काळे या कलाकारांमुळे मालिकेला लोकप्रियता लाभत आहे. मात्र या मालिकेतील एक कलाकार हा काही दिवस या मालिकेतून ब्रेक घेणार आहे. या मालिकेत विश्वजित चौधरी हे पात्र आनंद काळे यांनी साकारले आहे. या पात्रामुळे घराघरात त्यांना ओळख मिळाली आहे. मात्र पुढील काही दिवस ते या मालिकेतून ब्रेक घेणार आहेत.

आनंद काळे हे बाईकवरुन ‘कोल्हापूर ते कश्मीर लेह लडाख’ अशी सफर करणार आहेत. त्यामुळेच त्यांनी या मालिकेतून ब्रेक घेतला आहे. कारण चलो लेह लडाख असं म्हणत आनंद काळे यांनी त्यांच्या इन्स्टापेजवर ही माहिती शेअर केली आहे. मुळचे कोल्हापूरचे असलेले आनंद काळे हे कोल्हापूर ते काश्मीर, लेह लडाख अशी बाइक सफर करण्यासाठी रवाना होणार आहेत. त्यासाठी आनंद यांनी २१ दिवसांची सुट्टी घेतली आहे. लाडक्या विश्वजित काकांच्या या स्पेशल ट्रीपला मालिकेच्या टीमने आणि चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी यांनी हा प्लॅन बनवला होता. त्या प्लॅननुसार आता आनंद काळे २१ दिवस ७००० किलोमीटरचा प्रवास करून लेह लडाखची बाइक राइड करणार आहेत.

आनंद काळे हे गेल्या ३० वर्षापासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. नाटक व मालिकांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत आनंद काळे यांनी साकारलेली कोंडाजीबाबा फर्जंद ही भूमिका खूप गाजली. सौदामिनी ताराराणी मालिकेतील हंबीरराव मोहिते यांच्या रूपातही आनंद यांनी पसंती मिळवली आहे.

काही वर्षांपूर्वीच Kawasaki Ninja 1000 ही गाडी काळे यांनी खरेदी केली होती. पण पुढील २१ दिवस ७००० किलोमीटरचा प्रवास करुन ते आपले स्वप्न पूर्ण करताना दिसणार आहेत. यामुळे त्यांनी माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून ब्रेक घेतला आहे. त्यांनी याबाबत पोस्ट शेअर केली आहे. ‘ माझ्या बकेट लिस्टमधील आणखी एक कामासाठी मी निघत आहे. कोल्हापूर ते काश्मीर-लेह लद्दाख , अंदाजे ७००० किमी. तुमच्या सर्वांना खूप खूप प्रेम. निरोगी राहा आणि सुरक्षित रहा. तसेच मला पुढील २१ दिवसांसाठी मिस करा. ‘ असे काळे यांनी यात म्हटले आहे.

आनंद काळे हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी नाट्य तसेच चित्रपट, मालिका सृष्टीत कार्यरत आहेत. मूळचे कोल्हापूरचे असलेल्या आनंद यांनी आपले शिक्षण कोल्हापुरात पूर्ण केले. आनंद काळे हे हॉटेल व्यावसायिक आहेत हे बऱ्याच जणांना माहीत आहे. कोल्हापूर येथील प्रसिद्ध हॉटेल कार्निव्हल आणि राजपुरुष यांचे ते मालक आहेत. हॉटेल व्यवसायासोबत त्यांचा गणरायाच्या मुर्त्या बनवण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायाला त्यांच्या कुटुंबियांची देखील साथ मिळताना दिसते. आनंद यांना स्पोर्ट्स बाईक्सची अत्यंत आवड आहे.

Majhi Tujhi Reshim Gath Marathi TV Serial Actor Break

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – जिल्हयात कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

Next Post

झिरोधा हे स्टार्टअप कसं सुरू झालं माहितीय का? घ्या जाणून सविस्तर…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

modi 111
राष्ट्रीय

पंतप्रधानाच्या हस्ते मणिपूरमध्ये १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन…

सप्टेंबर 14, 2025
भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीसंदर्भात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा1 971x420 1
संमिश्र वार्ता

भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी संरक्षण उत्पादन उद्योगासाठी सहाय्यभूत ठरेल…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 14, 2025
Kia Range 1
संमिश्र वार्ता

किया इंडियाची घोषणा…ग्राहकांना मिळणार १.७५ लाख रूपयांपर्यंत हा फायदा

सप्टेंबर 14, 2025
crime1
क्राईम डायरी

पत्ता विचारण्याचा बहाणा करुन महिलेची अशी केली फसवणूक…पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सप्टेंबर 14, 2025
rain1
महत्त्वाच्या बातम्या

या दोन दिवसात महाराष्ट्रात अतिजोरदार पाऊस…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 14, 2025
IMG 20250913 WA0446
महत्त्वाच्या बातम्या

अपघाती मृत्यू प्रकरणी वारसांना एक कोटींची भरपाई… लोकन्यायालयामध्ये प्रकरण निकाली

सप्टेंबर 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, जाणून घ्या, रविवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 13, 2025
crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
Next Post
Zerodha

झिरोधा हे स्टार्टअप कसं सुरू झालं माहितीय का? घ्या जाणून सविस्तर...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011