नाशिक – महिलां सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन आता काम करु लागल्या आहे. पण, काही ठिकाणी एकत्र काम करत असले तरी धार्मिक उत्सव किंवा इतर कार्यक्रमात पुरुषच आघाडीवर असतात. पण, जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल कर्मचारी संघटनेने या सर्व परंपरेला फाटा देत सार्वजनिक गणेशोत्सवात सर्व जबाबदारी महिलांकडे दिली. त्यामुळे प्रथमच महिला कार्यकारणी, व सर्वच धार्मिक कार्यक्रमात महिलांचा सहभाग वाढला. जिल्हाधिकारी कार्यालयाती सर्व अधिका-यांनी या उपक्रमाला पाठींबा देत प्रोत्साहन दिले. जिल्हा महसुल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिनेश वाघ यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर अर्चना गरुड यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्हा महिला महसुल कर्मचारी गणेश मंडळाची कार्यकारणी करण्यात आली. त्यात सचिव वंदना महाले, खजिनदार – आश्विनी शिरसाठ, उपाध्यक्ष – पुनम नेरकर, सजावट प्रमुख रेखा काळे, सल्लागार – धनश्री कापडणीस यांची निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणून सरिता चव्हाण, विनिता कुलकर्णी, कांचन काकड, प्रियंका मोहिते, शिल्पा देशपांडे, वैशाली हिंडे, दिपाली उगलमुगले, रुपाली नागरे, शैला माळोदे, रिना राठोड, रुपाली ठाकुर, पल्लवी मोराणकर, जय़श्री टोपले, संगीता विसपुते, मीना पठाडे, हर्षदा भोये, नुतन ठाकरे, माधुरी नागरे, जय़श्री कोरडे, उषा सोनवणे कुदळे, जयश्री आहिरराव, अपर्णा कापसे, कल्पना बच्छाव, उज्वला रोकडे, सुहासिणी सोनवणे, पराते, योगिता जोशी, वनिता पदमेरे यांची निवड करण्यात आली. या महिला गणेश मंडळाने रोज गणरायाची आरती महिलांच्या हस्ते सुरु केली. त्यानंतर महिलांसाठी विविध उपक्रम घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले. गणेशोत्सवातच नाही तर वर्षभर या मंडळातर्फे आता विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती अध्यक्ष अर्चना गरुड- देवरे यांनी दिली.