नाशिक – कोरोना आपत्तीची सर्व इडापिडा ही विसर्जित होवो, असे साकडे घालत नाशिक जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या गणेशोत्सव महिला मंडळाने बाप्पाचे विसर्जन केले. विसर्जनाअगोदर महिलां सदस्यांनी वृक्षारोपणही केले. यावेळी नाशिक जिल्हा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिनेश वाघ , सरचिटणीस गणेश लिलके, रमेश मोरे, पप्पु देशपांडे, नायब तहसिलदार स्वप्नील सोनवणे, गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्षा अर्चना गरूड- देवरे हे उपस्थितीत होते. यावेळी अध्यक्षा अर्चना गरूड- देवरे यांनी सांगितले की, प्रत्येक संकटसमयी, आपत्तीच्या वेळी कायम तत्पर असलेला महसूल विभाग जीवाचे रान करून कर्तव्य बजावत असतो. त्यामुळेच यंदाच्या वर्षी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महिलांना प्रोत्साहन देऊन महिला सक्षमीकरण, आणि रूढी परंपरेला वेगळा फाटा फोडून महिलांना प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे पहिल्या दिवसापासून ते विसर्जनापर्यंत संपूर्ण गणेशोत्सव महिलांनी उत्साहात पार पाडले. प्रत्येक वेळी जिल्हयावर जेव्हा कुठलीही आपत्ती येते तेंव्हा शासकीय यंत्रणा कायम तत्पर असते, त्यात सर्वात महत्त्वाची भूमिका ही महसूल विभागाची असते. गेले दोन वर्षांपासून आपण कोरोना सारख्या महामारीचा सामना करत आहोत. कित्येक जीव आपल्यातून निघून गेलेले आहेत. त्यामुळे आपण सर्वच या परिस्थितीला वैतागलेलो आहोत. याच काळात बाप्पाचे आगमन ही झाले आणि आज बाप्पांना निरोप ही देण्यात आला. बाप्पाला निरोप देतांना महसूल विभागाच्या नाशिक जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या गणेशोत्सव महिला मंडळाने बाप्पाचे विसर्जन महिलांच्या हस्ते केले. यावेळी कोरोना आपत्तीची सर्व इडापिडा ही विसर्जित होवो, असे साकडे घालण्यात आले. याप्रसंगी वंदना महाले, पुनम नेरकर, रेखा काळे, अरुण तांबे, दिनेश पाडेकर, युनिक हेल्थचे रवी पाटील, रोटरी क्लबचे पराग पाटोदकर, दत्त पेट्रोलिमयचे संचालक बापू वावरे. गणेश, नरेंद्र पालवे, राजू थोरात, सागर खाडवे, संजय कुंभकर्ण, सतिष, नितीन पाटील, चौधरी साहेब व महसूल कॅन्टिनचे कर्मचारी हे उपस्थितीत होते.