मुकुंद बाविस्कर, मुंबई
नवीन वर्षात अनेकांनी आपले स्वतःच्या मालकीचे वाहन असावे, असे स्वप्न बघितले असेल. तसेच आकर्षक आणि दणकट वाहन खरेदीचा संकल्प किंवा नियोजन देखील केलेले असेल. त्यातही महिंद्रा कंपनीच्या एक्स यु व्ही 700 वाहन खरेदीचा ज्यांनी संकल्प केला असेल त्यांच्यासाठी असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे त्यांचा त्यांना या वाहन खरेदीसाठी जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही कारण कंपनीने प्रतीक्षा कालावधी कमी केला आहे. त्यामुळे अनेकांची संकल्पपूर्ती लवकरच होऊ शकते
महिंद्रा XUV700 हे या कंपनीसाठी उत्तम उत्पादन ठरत आहे. कारण लॉन्च झाल्यापासून या वाहनाला जोरदार मागणी आहे, त्यामुळे प्रतीक्षा कालावधी देखील दीड वर्षांपर्यंत म्हणजे 75 आठवड्यांपर्यंत पोहोचला आहे. XUV 700 खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना 18 महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र एका ताज्या अहवालानुसार, लॉन्च झाल्यापासून प्रथमच त्याचा प्रतीक्षा कालावधी कमी झाला आहे.या एसयूव्हीचा कमाल प्रतीक्षा कालावधी 75 आठवड्यांवरून आता 71 आठवड्यांवर आला आहे.
या वाहनाचा प्रतीक्षा कालावधी पहिल्यांदाच कमी झाला आहे. कोविड-19 आणि सेमीकंडक्टर चिपच्या कमतरतेच्या काळात महिंद्रासाठी 75,000 प्रलंबित ऑर्डर वेळेवर पूर्ण करणे कठीण काम असेल. XUV700 गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च करण्यात आला होता. त्याच्या पेट्रोल मॉडेलची डिलिव्हरी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि डिझेल मॉडेलची डिलिव्हरी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाली.
भारतीय बाजारात अधिकृतपणे ऑल न्यू XUV700 लाँच केली आहे. कार निर्मात्या कंपनीने ऑगस्टमध्ये ऑल न्यू XUV700 ची किंमत जाहीर केली होती. मात्र, सर्व व्हेरिएंटच्या किंमती जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. मात्र आता महिंद्राने XUV700 च्या सर्व व्हेरिएंटच्या किंमती जाहीर केल्या आहेत. ऑल न्यू Mahindra XUV700 AX आणि MX अशा दोन ग्रुप्समध्ये उपलब्ध आहे. MX सिरीज 11.99 लाख रुपयांपासून तर AdrenoX सिरीज 15.59 लाख रुपयांपासून सुरू होते.
सर्वात महाग व्हेरिएंट असलेली AX7 (7-सीटर) देखील ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा कंपनीला विश्वास आहे, या कारची किंमत 19.79 लाख रुपये आहे. महिंद्रा 1.8 लाख रुपयांच्या अतिरिक्त पेमेंटवर AX7 ऑटोमॅटिकसह लक्झरी पॅक ऑफर करेल. AX7 डिझेल ऑटोमॅटिकसह AWD व्हेरिएंट देखील उपलब्ध आहे. त्याची किंमत 1.3 लाख रुपये अधिक असेल.
XUV700 चे आतील लेआउट उत्तम आहे, सॉफ्ट-टच मटेरियल आणि क्रोम अॅक्सेंटचा वापर केबिनला आणखी उत्कृष्ट बनवतो. मध्यभागी 10.25 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम उपलब्ध आहे. XUV700 मध्ये सोनी 3D साउंड सिस्टीम, पुश-बटन स्टार्ट किंवा स्टॉप, केबिन एअर फिल्टर, अॅम्बियंट लायटिंग, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक एसी, पॉवर्ड फ्रंट सीट, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल आणि पॅनारोमिक सनरूफ सारखे फीचर्स यात आहेत.
XUV700 मध्ये फ्रंट आणि साइड एअरबॅग्स, ABS, EBD, हिल-होल्ड कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, रिव्हर्सिंग कॅमेरा, 360 डिग्री साराऊंड व्ह्यू इत्यादी सेफ्टी फीचर्स मिळतात. यासह, एसयूव्हीला ऑटो-बूस्टर हेडलॅम्प (जे ऑटोमॅटिक रुपात हेडलॅम्प्स थ्रो आणि इंटेन्सिटी वाढवतात.), ड्रायव्हर स्लीप डिटेक्शन, पर्सनल सिक्योरिटी अलर्ट सारख्या अनेक सेगमेंट-फर्स्ट सेफ्टी फीचर्स देखील यात देण्यात आले आहेत.
XUV700 टर्बो पेट्रोल इंजिन आणि डिझेल पॉवरप्लांटच्या निवडीसह उपलब्ध आहे. पेट्रोल युनिट 2.0 लीटर mStallion युनिट आहे, जे नवीन थार मध्ये उपलब्ध आहे. हे इंजिन 198 bhp पॉवर आणि 380 Nm टॉर्क जनरेट करते. डिझेल इंजिन mHawk इंजिन आहे जे 182 बीएचपी पॉवर आणि 450 एनएम टॉर्क जनरेट करते. ही दोन्ही इंजिन 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायासह उपलब्ध आहेत. XUV700 मध्ये 4X4 पॉवरट्रेनचा पर्याय देखील आहे.
विशेष म्हणजे SUV पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे आणि एकूण चार ट्रिम्स – MX, AX3, AX5 आणि AX7. SUV च्या MX, AX3 आणि AX5 ट्रिम्सच्या पेट्रोल व्हेरियंटवर सब-लेस वेटिंग 24 आठवड्यांपासून 29 आठवड्यांपर्यंत उपलब्ध आहे. डिझेलवर चालणाऱ्या MX प्रकारांसाठी प्रतीक्षा कालावधी 34 ते 36 आठवडे आहे, तर AX3 आणि AX5 प्रकारांसाठी 48 ते 51 आठवडे प्रतीक्षा कालावधी आहे. लक्झरी पॅक ट्रिमसह येणाऱ्या टॉप-स्पेक AX7 आणि AX7 वाहनांसाठी सर्वाधिक प्रतीक्षा 71 आठवड्यांपर्यंत आहे.
महिंद्र XUV700 चे नवनवीन प्रकार तयार करत असल्याचे काही अहवालातून समोर आले आहे. या वाहनांचे नाव AX7S असेल. येथे याचा अर्थ स्मार्ट पॅक असा होतो. हे प्रकार AX7 आणि AX7L दरम्यान सादर केले जातील. यात पॅनोरामिक सनरूफ, फ्रंट फॉग लॅम्प्स आणि एलईडी हेड आणि टेल लॅम्पसह क्रूझ कंट्रोल, पुश-बटण स्टार्ट वस्टॉप, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये मिळतील. तथापि, वायरलेस चार्जर, पॅसिव्ह कीलेस एंट्रीसह इलेक्ट्रिक डोअर हँडल, टेलिस्कोपिक स्टीयरिंग, ड्राइव्ह मोड, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, यांसारखी वैशिष्ट्ये यात नसतील.