मुंबई – महिंद्रा थारने भारतात चांगला व्यवसाय केला आहे. पण आता नव्या रुपाने भारतीयांनाच नव्हे तर जगभरातील वाहनप्रेमींना वेड लावले आहे. आतापर्यंत तुम्ही मर्सिडीझ बेन्झ जी क्लास, जीप ग्लॅडिएटर आणि रँगलर यासारख्या एसयूव्हीमध्ये 6X6 व्हर्जन बघितले असेल. पण आता भारतातील सर्वांत प्रसिद्ध डिझाईन हाऊस डीसी २ ने महिंद्रा थारसाठी नव्या रुपात एसयूव्ही आणली आहे.
हे मॉडेल थारच्या तुलनेत ५५ लाखांनी जास्त महाग आहे. जीएसटी जोडून त्याची किंमत ७० लाख रुपये एवढी होते. थारच्या कुठल्याही व्हेरियंटला यात बदलता येऊ शकते. पण त्यासाठी पहिले थार खरेदी करून तिला डीसीकडे सोपवावे लागेल. सध्या थारची किंमत १२.७८ लाख ते १५.०८ लाख रुपयांपर्यंत आहे. एखाद्याला तिला 6X6 मध्ये बजलयाचे असेल तर त्याला आरटीओचे अप्रूव्हल घ्यावे लागेल. त्यानंतर १२० दिवसांनी रुप बदललेली थार तुमच्या हाती येईल.
मॉडिफाईड थारचे जवळपास सर्वच बॉडी पॅनल नवे आहेत. या नव्या एसयूव्हीचे रुप बऱ्यापैकी गोल झाले आहे. तर सध्याचे थारचे मॉडेल चोकोनी आकारात आहे. नव्या बदलानंतर यात आफ रोड मेटल लागलेले असावे, असे दिसते. भारतात या नव्या रुपात तेच इंजीन असेल जे नियमीत थारमध्ये आहे. युकेकडे बघणाऱ्या भारतीय लोकांना ध्यानात ठेवून हे नवे मॉडेल तयार केल्याचे डीसीचे म्हणणे आहे. या गाडीसाठी फोर्डचे ४.० लीटर इंजीन मिळण्याची शक्यता आहे.