मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आकर्षक, दणकट आणि अनेक सुविधांनी युक्त असलेली एसयुव्ही कार असावी अशी अवेकांची इच्छा असते. देशातील चौथी सर्वात मोठी वाहन निर्माती कंपनी महिंद्राने एक मोठा रेकॉर्ड केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या स्कॉर्पिओ एन या एसयुव्ही कारला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच अवघ्या दीड तासात तब्बल एक लाख कारचे बुकींग झाले आहे. परिणामी, ग्राहकांना आता तब्बल २ वर्षांनी म्हणजेच सप्टेंबर २०२४ नंतरच कारची डिलेव्हरी मिळणार आहे.
नवीन एसयूव्ही 6 आणि 7 सीटर पर्यायांसह उपलब्ध आहे. स्कॉर्पिओ एनची एक्सशोरूम किंमत बेस व्हेरियंटसाठी 11.99 लाख रुपयांपर्यंत असून टॉप व्हेरिएंटसाठी 23.90 लाख मोजावे लागणार आहेत. महिंद्राने 31 जुलै 2022 पासून स्कॉर्पिओ एनची अधिकृत बुकिंग सुरू केली त्या वेळी सुरुवातीच्या 25,000 युनिट्स अवघ्या पाच मिनिटांत विकल्या गेल्या होत्या. तसेच स्कॉर्पिओ एनच्या बंपर बुकिंगमुळे, त्याची डिलिव्हरीची तारीख सप्टेंबर 2024 पर्यंत पोहोचली आहे. तुम्ही बुकिंग केली असेल आणि आता तुम्ही इतका वेळ थांबू शकत नसल्यास, केवळ 2100 रुपये देऊन आपण बुकिंग रद्द करू शकता.
बुकिंग सुरू होताच सुरुवातीच्या अर्ध्या तासात तब्बल १८ हजार कोटी रुपये मूल्य असलेल्या कार ग्राहकांनी बूक केल्या आहेत. आतापर्यंत महिंद्राच्या एसयूव्ही ७०० कारची लोकांमध्ये मोठी क्रेझ होती. आता स्कॉर्पिओ एन कारची देखील तशीच किंबहुना त्यापेक्षा मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. महिंद्र स्कॉर्पिओ एनचे बुकिंग ओपन झाल्यानंतर दीड तासात एक लाख एसयुव्हीचे बुकिंग झाले. स्कॉर्पिओ एन अनेक प्रकारांमध्ये उपलब्ध असून 2.0 लीटर mStallion पेट्रोल आणि 2.2 लीटर mHaw डिझेल इंजिन पर्यायांसह ऑफर केली जाते.
नवीन एसयुव्ही मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह उपलब्ध आहे. स्कॉर्पिओ एन Z2, Z4, Z6, Z8 आणि Z8L या एकूण पाच व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. पण महिंद्रा स्कॉर्पिओ एनच्या बुकिंगने अनेक विक्रम मोडले आहेत. डीलर्सनीही वाहन बुक केलेल्या ग्राहकांना ई-मेल पाठवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये, Z4 आणि Z6 प्रकारांच्या वेटिंग ऑर्डरच्या डिलिव्हरीचे वेळापत्रक पाठवले जात आहे.
या कारमध्ये कंपनीने एकापेक्षा एक असे दमदार फीचर्स दिले आहेत. ही कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन इंजिन पर्यायांमध्ये येते. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन्ही ट्रान्समिशन पर्याय देण्यात आले आहेत. या कारमध्ये २०.३२ सेमी इतकी मोठी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे. यात ७० पेक्षा जास्त कनेक्टेड कार फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच ३ डी साऊंड सिस्टिम, व्हॉईस कमांड, ६ वे पॉवर अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, मोठं सनरूफ, इंटेलिजेंट 4X टेरेन मॅनेजमेंट सिस्टम यात देण्यात आली आहे.
नवीन स्कॉर्पिओ एनमध्ये 8 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट आणि वायरलेस चार्जिंग सारखी फीचर्स मिळणार आहे.
Mahindra Scorpio N SUV Car Booking 2 Years Waiting