मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशभरात पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, त्यामुळे नागरिक पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांऐवजी इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांकडे वळत आहेत. फॅक्टरी फिटेड सीएनजी गाड्यांना बाजारात सध्या मोठी डिमांड आहे. त्यामुळेच प्रमुख वाहन उत्पादक कंपन्या आता सीएनजी कार्स लाँच करू लागल्या आहेत. मेन्टेनन्सच्या बाबतीतदेखील सीएनजी कार्स या पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या कारपेक्षा स्वस्त आहेत.
सीएनजी कार्सच्या सेगमेंटमध्ये सध्या महिंद्रा ही कंपनी आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ टाटा मोटर्सचा नंबर लागतो. सध्या बाजारात अनेक सीएनजी कार उपलब्ध आहेत पण काही कंपन्या नवीन सीएनजी मॉडेल्स सादर करणार आहेत. कमी किमतीसोबतच या गाडीचे मायलेजही जबरदस्त म्हणजेच 35KM हून अधिक आहे. सध्या कमर्शिअल वाहनांच्या सेगमेंटमध्ये महिंद्रा कंपनी ही टाटा मोटर्सनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महिंद्राने भारतीय बाजारात आपले नवे कमर्शिअल वाहन लॉन्च केले असून त्याला जीतो प्लस CNG 400 (Jeeto Plus CNG 400) नाव देण्यात आले आहे. याची किंमत केवळ 5.26 लाख रुपये (एक्स-शोरूम) एवढी ठेवण्यात आली आहे. एवढेच नाही, तर, या वाहनात आपल्याला सेगमेंटचा सर्वोत्तम पेलोड, रेंज आणि मायलेज मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे. विशेष म्हणजे, कमी किमतीसोबतच या गाडीचे मायलेजही जबरदस्त म्हणजेच 35KM हून अधिक आहे. सध्या कमर्शिअल वाहनांच्या सेगमेंटमध्ये महिंद्रा कंपनी ही टाटा मोटर्सनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. जुलै 2022 मध्ये कंपनी 16,478 युनिट्सची विक्री केली आहे.
महिंद्रा जीतो प्लस सीएनजी शहरात आणि शहरा बाहेरच्या वापरासाठीही अनुकूल आहे. हिला 2 सीएनजी टँक (40L+28L) देण्यात आले आहेत. ते दोन्ही मिळून एकूण 68 लिटर एवढे आहेत. जे या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच देण्यात आले आहेत. टँक पूर्ण भरलेला असल्यास ही पिकअप 400km हून अधिक चालेल. यामुळेच हिला cng 400 नाव देण्यात आले आहे. ही पिकअप आपल्याला 35.1 किमी प्रति किलोग्रॅमचे मायलेज देईल, असा दावा कंपनीने केला आहे.
याशिवाय, या गाडीची पेलोड क्षमतादेखील 650 किलोग्रॅम एवढी आहे. ही गाडी आपल्याला इतर पिकअपच्या तुलनेत 30 टक्के अधिक बचत करून देईल, असा दावादेखील कंपनीने केला आहे. महिंद्रा जीतो प्लस सीएनजीमध्ये देण्यात आलेले इंजिन 1,600-2,200 आरपीएमवर 15 किलोवॅट पीक पावर आणि 44 एनएम पीक टॉर्क ऑफर करते. सुमारे 3 वर्ष व 72,000 किमी वारंटीसोबत देण्यात आले आहे. त्याचा देखभाल खर्च 0.22 रुपये प्रति किमी एवढा आहे.
Mahindra Launch Jeeto Plus CNG 400 Vehicle Price and details