इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतातील इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता ट्रेंड लक्षात घेता, सर्व ऑटोमेकर्स वेगाने इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये गुंतले आहेत. जेणेकरून आगामी काळात वाढत्या मागणीची पूर्तता करता येईल. महिंद्रा अँड महिंद्राने तेलंगणा सरकारसोबत इलेक्ट्रिक वाहन निर्मिती युनिट स्थापन करण्यासाठी करार केला आहे. त्यामुळे पुण्यानंतर आता तेलंगाणात इलेक्ट्रिक कारची निर्मिती होणार आहे.
नवीन सुविधा महिंद्राच्या इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात सुमारे 10,000 कोटी रुपयांच्या एकूण गुंतवणुकीचा एक भाग असेल. यामुळे तेलंगणात महिंद्रा उद्योग समूह सुमारे 1,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. पुणेनंतर ही अशी दुसरी उत्पादन सुविधा असेल. तेलंगणामध्ये महिंद्राचा प्लांट इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर तसेच इलेक्ट्रिक चार चाकी गाड्या तयार करेल.
आठ वर्षांसाठी गुंतवणूक
करारानुसार महिंद्रा या प्रकल्पात आठ वर्षांसाठी गुंतवणूक करणार आहे. लास्ट माईल मोबिलिटी बिझनेस विकसित करण्यासाठी, हा प्रकल्प महिंद्राच्या झहीराबाद सुविधेवर असेल. नियामक फाइलिंगमध्ये, महिंद्राने सांगितले की सुविधा XUV400 इलेक्ट्रिक SUV सारखी प्रवासी वाहने देखील तयार करेल.
XUV400 इलेक्ट्रिक SUV
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, ऑटोमेकर महिंद्राने सांगितले होते की, ते पुण्यात इलेक्ट्रिक वाहनांसाठी एक नवीन उत्पादन सुविधा उघडणार आहे. ऑटोमेकर नवीन ईव्ही सुविधेसाठी 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, ज्याला महाराष्ट्र सरकारच्या औद्योगिक प्रोत्साहन योजनेंतर्गत गुंतवणुकीची मान्यता देखील देण्यात आली आहे. यासोबतच कंपनी येत्या काही दिवसांत इलेक्ट्रिक वाहने आणणार आहे. ज्याची तयारी कंपनीने जोरात सुरू केली आहे. सध्या महिंद्राने XUV400 इलेक्ट्रिक SUV सादर केली आहे.
Mahindra Industry Electric Vehicle Production Centre