मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्याच्या काळात बहुतेक जणांना आपल्याकडे स्वतःचे वाहन असावे असे वाटणे सहभागी आहे, त्यातच दूरवर देवदर्शन, पर्यटन तथा सहलीसाठी सहकुटुंब सहपरिवार जाण्याकरता मोठे वाहन असल्यास फायदेशीर ठरते. सहाजिकच महिंद्रा बोलेरो सारख्या वाहनाला सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे दिसून येते. कारण महिंद्रा ही देशातील लोकप्रिय कार उत्पादक कंपनी आहे.
महिंद्रा बोलेरो हे भारतातील पसंतीच्या वाहनांपैकी एक लोकप्रिय वाहन समजले जाते. या कारच्या सर्व व्हेरियंटचे नागरिकांनी खूप कौतुक केले आहे. आता लवकरच महिंद्रा कंपनी बोलेरोचे एक नवीन मॉडेल घेऊन येत असून हे मॉडेल कोणीही त्याच्या प्रेमात पडेल. इतकेच नव्हे तर सर्व कुटुंबासाठी ही अत्याधुनिक आकर्षक कार घेण्याचा कुणालाही मोह होऊ शकतो,
महिंद्रा बोलेरोचे ९ सीटर मॉडेल येत आहे.
महिंद्रा कंपनी येत्या काही महिन्यांत ही नवीकोरी कार लॉन्च करू शकते. यात एकापेक्षा जास्त वैशिष्ट्ये आहेत. इतकेच नव्हे तर कंपनीच्या इतर मॉडेल्सच्या तुलनेत हे मॉडेल खूप लांब, रुंद व मोठे आहे. या मॉडेलमध्ये खूप चांगले वैशिष्ट्ये आहेत. त्याचे इंजिन 1493 cc चे MHAWK75 BSVI बेसच असून हे सर्वात जबरदस्त कार इंजिन आहे.
या शिवाय बोलेरोच्या नवीन मॉडेलमध्ये खालील वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, एडजस्टेबल स्टीयरिंग, ऑटोमॅटिक क्लायमेंट कंट्रोल, एअर क्वॉलिटी कंट्रोल, रिएर एसी व्हेंट्स, फ्रंट हिटेड सीट्स, हिटेड सीट्स रिएर, रिमोट ट्रंक ओपनर असे फिचर्स यात दिसून येतात. महिंद्रा बोलेरो २०२४ कारचे मॉडेल मॅन्युअल ट्रान्समिशनसह ६-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. यात पॉवर स्टीयरिंग, फ्रंट आणि रियर पॉवर विंडो यांसारखी वैशिष्ट्ये देखील आहेत.
विशेष म्हणजे महिंद्रा बोलेरो मॉडेलच्या टॉप व्हेरिएंटची किंमत १०.७९ लाख रुपये आहे, बोलेरो ही ग्रामीण जनतेची पहिली पसंती आहे. कारण त्या भागात गाडी चालवण्याची एक वेगळीच अनुभूती देते. महिंद्रा कार उत्पादक कंपनी SUV वाहनांसाठी ओळखली जाते. अत्यंत मर्यादित वैशिष्ट्यांसह आणि केवळ एक इंजिन पर्याय असलेल्या या एसयूव्हीची खेड्यापासून शहरांपर्यंत क्रेझ आहे. महिंद्रा बोलेरो ही B2-सेगमेंट SUV असून यात ७ प्रवासी बसू शकतात. महिंद्रा बोलेरो २०२२( बेस व्हेरिएंट B4 ) ची एक्स-शोरूम किंमत ९.५३ लाख आहे. तर टॉप व्हेरिएंट (B6 OPT ) ची किंमत १०.४८ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
Mahindra Bolero 9 Seater Features Price