मुंबई – महिंद्रा अँड महिंद्राची बहुप्रतिक्षीत ७ आसनी XUV700 ची खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांसाठी महत्त्वाचे वृत्त आहे. येत्या ७ ऑक्टोबरपासून ग्राहकांनी बुकींग करता येईल. पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये ही कार एमजी हेक्टर, टाटा हॅरियर, टाटा सफारी, ह्युंदाई क्रेटा आणि किआ सेल्टोस यांच्याशी स्पर्धा करेल.
एसयूव्ही पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पर्यायांमध्ये येते. यात 2.0-लिटर, फोर-सिलिंडर, mStallion टर्बो-पेट्रोल इंजिन असून ते 200hp आणि 380Nm पीक टॉर्क जनरेट करते. दुसरे इंजिन 2.2-लिटर, चार-सिलेंडर एमहॉक टर्बोचार्ज्ड डिझेल आहे. ते 185 एचपी पर्यंत पॉवर आणि 420 एनएम पर्यंत टॉर्क जनरेट करते. दोन्ही इंजिन 6 स्पीड मॅन्युअल किंवा 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायासह देण्यात येतात. XUV700 SUV एकूण 29 रूपांमध्ये असून 5 सीटरचे 13 व्हेरिएंट आणि 7 सीटर मॉडेलचे 16 व्हेरिएंट असतील. 7 सीटर व्हेरिएंटच्या किंमती 13.19 लाख रुपयांपासून 20.69 लाख रुपयांपर्यंत (सर्व किमती एक्स-शोरूम) पासून सुरू होतील.
महिंद्रा XUV700 7-सीटर कारच्या विविध प्रकारांची किंमत अशी:
MX MT डिझेल 13.19 लाख रुपये,
MX MT पेट्रोल 12.69 लाख रुपये,
AX5 MT डिझेल FWD 16.69 लाख रु.
AX5 AT डिझेल FWD 17.99 लाख रुपये
AX5 MT पेट्रोल FWD रु. 15.69 लाख
AX5 AT पेट्रोल FWD 16.99 लाख रुपये
AX5 AT पेट्रोल AWD 18.49 लाख रुपये
AX5 (O) AT डिझेल FWD 18.69 लाख
AX5 (O) AT पेट्रोल FWD 17.69 लाख
AX7 AT डिझेल FWD 19.49 लाख रुपये
AX7 AT डिझेल ऑप्ट FWD20.19 लाख
AX7 AT पेट्रोल ऑप्ट AWD 21.69 लाख
AX7 AT पेट्रोल FWD 18.49 लाख रुपये
AX7 AT पेट्रोल ऑप्ट FWD 19.19 लाख
AX7 AT पेट्रोल AWD 19.99 लाख रुपये
AX7 AT पेट्रोल ऑप्ट AWD 20.69 लाख रुपये आहे.
(बुकींगवेळी डीलरशी संपर्क साधावा)