मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माहीम विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर हे विधानसभा निवडणूक लढवणार आहे. आज दिवसभर अनेक नाट्यमय घडामोडीनंतर त्यांनी अखेर राज ठाकरे यांची भेट मागितली. त्यानंतर ते भेटील पोहचले. पण, राज ठाकरे यांनी भेट नाकारल्यानंतर त्यांनी मी निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तुम्हाला उभे राहायचे असेल तर रहा, मला तुमच्याशी काही बोलायचे नाही असे राज ठाकरे यांनी सांगितल्याचे ते म्हणाले.
या मतदार संघात शिंदे गटाने अमित ठाकरे यांना पाठींबा द्यावा यासाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न सुरु आहे. पण, सदा सरवणकर यांनी या दबावाला झुकारत उमेदवारी करणार असल्याचे स्पष्ट केले. मनसेनेने शिंदे गटा विरोधात उभे केलेले सर्व उमेदवार मागे घ्यावे. त्यानंतर मी पक्षासाठी उमेदवारी मागे घेण्यास तयार आहे असे त्यांनी सांगितले होते. त्यानतंर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन त्यांना आला. त्यानतंर त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. नंतर ते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले व तेथेच त्यांनी निर्णय जाहीर केला.
माहीम चर्चेतला मतदार संघ
माहीम मतदार संघात सध्या चर्चेचा मतदार संघ ठरला आहे. या मतदार संघातून मनसेचे अमित ठाकरे हे पहिल्यांदा निवडणूक लढवत आहे. त्यामुळे महायुतीने त्यांना पाठींबा देण्याच्या हालचाली सुरु केल्या. पण, सरवणकर यांनी निवडणूक लढवणारच असे सांगत प्रचारही सुरु केला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने या ठिकाणी महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे.