इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वाई तालुक्यातील कुसगाव, विठ्ठलवाडी, व्याहळी, एकसर आणि पार्टेवाडी गावातील महिलांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या रक्ताने पत्र लिहून अवैध स्टोन क्रशर बंद करण्याची मागणी केली.
गेल्या २२ दिवसांपासून या गावचे नागरीक अवैध स्टोन क्रशरच्या विरोधात मुंबईपर्यंत पायी चालत आले आहेत, तरीही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. आता हे त्यांचं केवळ पत्र नाही तर गेल्या अनेक वर्षांचे अश्रू आहेत. त्यामुळं किमान आता तरी हे खडी क्रशर कायमस्वरुपी बंद करण्याचा आदेश देऊन या भगिनींचे अश्रू पुसा आणि त्यांना राखी पौर्णिमेची ओवाळणी द्या अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
ऱाखी पौर्णिमेच्या दिवशीच हे पत्र लिहल्यामुळे त्यांची चर्चा सुध्दा झाली. आपल्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक मार्ग आहे. पण, रक्ताने पत्र लिहून असे कृत्य करणे त्रासदायक आहे. प्रश्न कितीही गंभीर असला तरी त्यासाठी लोकशाहीत अनेक आयुधे आहेत. त्यातून लक्ष वेधू शकतो.