मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे मुंबईतील प्रादेशिक केंद्राने (एसएआय आरसी) फिट इंडिया चळवळ अंतर्गत एक विशेष कार्यक्रम आयोजित करून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला. या कार्यक्रमाचा उद्देश महिलांना सशक्त करणे, निरोगी ठेवणे, आत्मरक्षा आणि तंदुरुस्ती यावर भर देणे हा होता.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मुख्य महाव्यवस्थापक पुष्पमित्र साहू यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. प्रमुख पाहुण्यांमध्ये लक्ष्य शूटिंग क्लबच्या संस्थापक सुमा शिरूर, मुंबई दक्षिण वाहतूक विभागाच्या उपपोलीस आयुक्त प्रज्ञा जेडगे, पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या जनसंपर्क संचालिका डॉ. निवेदिता श्रेयन्स, फिट इंडिया मूव्हमेंटचे राजदूत डॉ. मिकी मेहता, तसेच आरबीआयच्या व्यवस्थापक अश्विनी घुगे यांचा समावेश होता.
विशेष आमंत्रितांमध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरण – मुंबईच्या वरिष्ठ कबड्डी व खो-खो प्रशिक्षक सिमरत गायकवाड, ज्ञानतारा अकादमीच्या प्राचार्या डॉ. अजंता यादव, आणि ऑल मार्शल आर्ट्स सेल्फ-डिफेन्स फेडरेशनचे अध्यक्ष बी. के. पवार यांचा समावेश होता. या कार्यक्रमात आत्मरक्षा प्रात्यक्षिके, तंदुरुस्तीविषयी मार्गदर्शन, आणि संतुलित व निरोगी जीवनशैली यावर चर्चा करण्यात आली.