नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– येथील दसा श्रीमाली वैष्णव गुजराथी मंडळाच्या वतीने दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील आदर्शवत महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी मंडळातर्फे मेजर राजश्री लोखंडे (सेवानिवृत्त लष्कर अधिकारी), सौ तेजस्विनी पवार (समुपदेशक व समाजसेविका) आणि सौ उज्वला जगताप (वृद्धाश्रम संचालिका) यांना सन्मानित करण्यात येईल.
अखिल भारतीय ब्राह्मण संघ मंगल कार्यालयात सायं.५.०० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी समाजातील महिलांचा सहभाग असलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष सर्वश्री डॉ. डी.एम. गुजराथी, सचिव सीए उज्वल नवसारीकर उपाध्यक्षा सौ. श्वेताबेन गुजराथी, खजिनदार श्री अच्युतभाई गुजराथी व सर्व कार्यकारी मंडळ प्रयत्नशील आहे.