नाशिक – जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी महिला यांनी महिलांचे आरोग्य, महिलांचे कायदे, आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या या विषयावर चर्चासत्रातून जागतिक महिला दिन साजरा केला. या प्रसंगी उपजिल्हाधिकारी वासंती माळी यांनी महिलांचे आरोग्य, उपजिल्हाधिकारी स्वाती थवील यांनी महिलांच्या अडचणी याबाबत माहिती दिली. तहसीलदार रचना पवार यांनी महिलांचे कायदे याविषयी माहिती दिली तर तहसीलदार राजश्री आहिरराव यांनी मुलांचे संस्कार आणि संगोपन या विषयावर अनुभवलेले अमेरिकेतील क्षण यातून संवाद साधत महिलांना रोजच्या जीवनात उत्साही ,आनंदी जगण्यावर भर दिला. या कार्यक्रमाचे समन्वयन अर्चना देवरे यांनी केले. या प्रसंगी सर्व महसूल अधिकारी कर्मचारी महिला उपस्थित होत्या.