इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रिलायन्स ट्रेंड्सने आपला नवीन समर-ऑकेजन वेअर कलेक्शन बाजारात सादर केला आहे. कंपनीने सुपरस्टार महेश बाबू आणि त्यांची मुलगी सितारा यांच्या सोबत ‘न्यू टाइम्स. न्यू ट्रेंड्स’ कॅम्पेनची सुरुवात केली आहे. हे नवीन कलेक्शन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्याच्या, ट्रॅव्हलसाठी आणि फॅशनच्या गरजांसाठी डिझाइन करण्यात आले आहे. महेश बाबू आणि सितारा यांच्या एका चित्रपटासोबत हे कलेक्शन लाँच झाले असून, या चित्रपटात दोघांनाही कूल कॅज्युअल, वॉव वेस्टर्न आणि पार्टी एथनिक वेअरमध्ये स्टायलिश अंदाजात दाखवण्यात आले आहे.
रिलायन्स ट्रेंड्सचे हे नवीन कलेक्शन ग्राहकांना अशा जगात घेऊन जाते जिथे परंपरा आणि आधुनिकता यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो. या कलेक्शनमध्ये भारताची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि आधुनिक डिझाइन्सचा अप्रतिम मिलाफ आहे. हे कलेक्शन मुख्यतः उन्हाळ्यासाठी डिझाइन करण्यात आले असले तरी रिलायन्स ट्रेंड्समध्ये वर्षभर आणि प्रत्येक प्रसंगी किंवा ऋतूसाठी भरघोस कलेक्शन उपलब्ध आहे. मग तो सणासुदीचा पोशाख असो, कॅज्युअल वेअर असो किंवा ट्रेंडी आऊटफिट — रिलायन्स ट्रेंड्समध्ये प्रत्येकासाठी काही ना काही नक्कीच आहे.
कंपनीचा दावा आहे की, “या सीझनमध्ये रिलायन्स ट्रेंड्सने आतापर्यंतचे सर्वात नवीन कलेक्शन सादर केले आहे, जे ग्राहकांना आकर्षक किंमतीत स्टायलिश लुक देते. ही नवीन रेंज केवळ ट्रेंडमध्येच नाही तर ट्रेंडसेटिंगदेखील आहे.”