मंगळवार, जुलै 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पूल पूर्णपणे बांधलेला, पण दोन्ही बाजूंनी रस्ताच नव्हता…महेश झगडे यांची पोस्ट चर्चेत

by Gautam Sancheti
जून 16, 2025 | 4:57 pm
in इतर
0
506648167 23992046913755201 4663400728654200701 n

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इंद्रायणी नदीवरील कुंदमळा येथील पूल कोसळल्यानंतर माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त असतांना त्यांनी रिंग रोडसाठी फिरत असतांना एका पुलाविषयी फेसबुकमध्ये फोटोसह पोस्ट टाकली आहे. हा पूल पूर्णपणे बांधलेला होता, पण दोन्ही बाजूंनी रस्ताच नव्हते! दोन्ही टोकांवर रस्ता नसतानाही हा पूल का बांधण्यात आला, याचे उत्तर मला मिळाले नाही (खाली फोटो). हा खर्च पूर्णपणे अनावश्यक होता. हाच निधी तिथे वापरण्यात आला असता, जिथे पुलाची तातडीची गरज होती, तर त्याचा निश्चितच जनतेला फायदा झाला असता.

झगडे यांनी पोस्टमध्ये लिहले आहे की, महानगर आयुक्त, पीएमआरडीए या पदावर असताना, २०१६ मध्ये मी संपूर्ण ७४०० चौ. कि.मी.चा परिसर सातत्याने फिरत असे. पुणे परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी, १९८७ साली प्रादेशिक नियोजन आराखड्यात रिंग रोडचे नियोजन करण्यात आले होते. पण माझ्यापूर्वीचे अधिकारी “कशात” तरी इतके व्यग्र होते की, २९ वर्षे तो रिंग रोड प्रत्यक्षात आणण्याची त्यांना फुरसतच मिळाली नाही.

मी रिंग रोड तयार करण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण ११० कि.मी.चा रस्ता स्वतः अधिकाऱ्यांच्या टीमसह—कधी पायी, कधी वाहनाने—प्रत्यक्ष फिरून पाहिला. अशाच एका पाहणी दौऱ्यात, देहूपुढे इंद्रायणी नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एक पूल बांधलेला दिसून आला.
हा विनोद समजावा की देशाच्या प्रशासनाचे दुर्दैव म्हणावे—हा पूल पूर्णपणे बांधलेला होता, पण दोन्ही बाजूंनी रस्ताच नव्हते! दोन्ही टोकांवर रस्ता नसतानाही हा पूल का बांधण्यात आला, याचे उत्तर मला मिळाले नाही (खाली फोटो). हा खर्च पूर्णपणे अनावश्यक होता. हाच निधी तिथे वापरण्यात आला असता, जिथे पुलाची तातडीची गरज होती, तर त्याचा निश्चितच जनतेला फायदा झाला असता.
आता, इंद्रायणी नदीवरील कुंदमळा येथील पूल कोसळून जी जीवितहानी झाली, ती पाहता, अधिकाऱ्यांची कातडी किती बळकट झाली आहे, याची तीव्र जाणीव होते—ही भावना मी यापूर्वीही व्यक्त केली होती. अशा अधिकाऱ्यांनी तरी हा फोटो पाहून आपल्या बेफिकिरीची आणि प्रशासकीय विकृतीची जाणीव ठेवावी, ही किमान अपेक्षा!

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

झोपेत विषारी साप चावल्याने २७ वर्षीय तरूणाचा मृत्यू

Next Post

विनयभंगाच्या चार घटना… वेगवेगळया भागात दोन अल्पवयीन मुलींसह महिलांचा परिचीतांनी केला विनयभंग

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
rape

विनयभंगाच्या चार घटना... वेगवेगळया भागात दोन अल्पवयीन मुलींसह महिलांचा परिचीतांनी केला विनयभंग

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी मदतीसाठी संकोच करू नये, जाणून घ्या, बुधवार, २३ जुलैचे राशिभविष्य

जुलै 22, 2025
Novha Merrytime

सागरी शिक्षण क्षेत्रात मुक्त विद्यापीठाचा प्रवेश…या अकादमी सोबत सामंजस्य करार

जुलै 22, 2025
kanda onion

केंद्राच्या कांदा खरेदीला या तारखे पर्यंत मुदतवाढ मिळावी….मुख्यमंत्र्यांना किसान मोर्चाचे पत्र

जुलै 22, 2025
cbi

परीक्षा पेपरफुटी प्रकरण…आठ माजी रेल्वे कर्मचाऱ्यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

जुलै 22, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

५ वर्षांसाठी २५ हजार कोटींची तरतूद…अशी आहे कृषीसमृद्ध योजना

जुलै 22, 2025
amit shah11

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह या तारखेला राष्ट्रीय सहकार धोरण करणार जाहीर…

जुलै 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011