इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ज्येष्ठ सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी विविध प्रश्नांना उत्तर दिली. मराठी भाषा, मराठी माणूस आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याबाबतही राज ठाकरे यावेळी बोलले.
या मुलाखतीमध्ये मांजरेकर यांनी शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकतात का असा प्रश्न केला. त्यावर राज ठाकरे यांनी मोठे विधान युतीबद्दल केले आहे. आमच्यातील वाद, आमच्यातील भांडण, आमच्यातील गोष्टी किरकोळ आहेत. त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं हे वाद या गोष्टी शुल्लक आहेत असे राज ठाकरे यांनी सांगत उध्दव ठाकरेंना युतीचे संकेत दिले.