नाशिक -दी. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स (इंडिया) नाशिक लोकल सेंटरचे माजी अध्यक्ष इंजि. महेंद्र कोठारी यांची दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स (इंडिया) महाराष्ट् स्टेट सेंटरच्या अध्यक्षपदी २०२१ – २०२३ या कार्यकाळासाठी बिनविरोध निवड झाली आहे. नाशिकला हा बहुमान पहिल्यांदा मिळाल्याने उद्योग आणि अभियांत्रिकी क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. इंजि. महेंद्र कोठारी हे दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स (इंडिया) कोलकाताच्या राष्ट्रीय कार्यकारिणी इलेक्ट्रिकल शाखेचेचे प्रतिनिधित्व गेले ५ वर्षांपासून करत आहे. तसेच ते महाराष्ट्र स्टेट सेंटरच्या मॅनेजिंग कमिटीचे सभासद होते. निमाचे ते माजी अध्यक्ष होते तसेच FASSI या औद्योगिक संघटनेचे कार्यकारिणी सदस्य देखील होते. दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स (इंडिया) नाशिक लोकल सेन्टरचे अध्यक्ष इंजि. सुमित खिंवसरा, मानद सचिव इंजि. समीर कोठारी, इंजि. नरेंद्र बिरार, इंजि. संतोष मुथा, इंजि. मनीष कोठारी, इंजि. महावीर चोपडा, इंजि. विपुल मेहता, इंजि. दिपक पंजाबी, इंजि. धीरज पिचा, इंजि. विलास पाटिल, इंजि. अजित पाटिल, इंजि. सश्ररश्मी पुंड, इंजि. राजकुमार सिरसम, इंजि. अंकिता पारख, इंजि. मंगेश गांधी, इंजि. महेंद्र शिरसाठ, इंजि. वेदांत राठी, इंजि. श्रीकांत बच्छाव, इंजि. पंकज जगताप, इंजि. गौरव धारकर, इंजि. संजय देशपांडे, इंजि. संकेत आंबेकर यांनी महाराष्ट्र स्टेट सेन्टर चे अध्यक्ष इंजि. महेंद्र कोठारी यांचे अभिनंदन केले.