इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर आता महायुतीने संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडला. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अजित पवार यांनी रिपोर्टकार्ड मांडले. यावेळी त्यांनी लाडकी बहिण योजना कायमस्वरुपी राहील असेही सांगितले.
या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे सरकार आल्यानंतर आपले राज्य पहिल्या क्रमांकावर आले. लाखो रुपयाचे प्रोजेक्ट महाराष्ट्रात सुरु झाल्याचेही त्यांनी सांगितले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामांची व कल्याणकारी योजनांची माहिती सांगितली.
बघा ही लाईव्ह पत्रकार परिषद…..