इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून त्यात २८ चेह-यांना संधी मिळू शकते असे बोलले जात आहे.
या निवडणुकीत महायुतीला २३० जागा मिळाल्या असून त्यात भाजप १३२ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला ५७ तर अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या आहे.
आता या नव्या सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा फॅार्म्युलावर चर्चा सुरु झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार भाजपला सर्वाधिक २१ मंत्रिपदे मिळू शकेल. तर शिवसेना शिंदे गटाला १२ व राष्ट्रवादी अजित पवार गटाला १० मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. सहा ते सात आमदारांच्या मागे एक मंत्रिपद असे ठरले असल्याचीही चर्चा आहे.
भाजप
देवेंद्र फडणवीस
सुधीर मुनंगटीवार
चंद्रशेखर बावनकुळे
गिरीष महाजन
मंगलप्रभात लोढा
सुरेश खाडे
प्रवीण दरेकर
पंकजा मुंडे
राहुल कुल
निलेश राणे
चित्रा वाघ
प्रसाद लाड
किसन कधोरे
शिवसेना शिंदे गट
एकनाथ शिंदे
दादा भुसे
उदय सामंत
दिपक केसरकर
शंभुराज देसाई
गुलाबराव पाटील
भरत गोगावले
प्रताप सरनाईक
संजय शिरसाट
संजय राठोड
राष्ट्रवादी अजित पवार गट
अजित पवार
छगन भुजबळ
दिलीप वळसे पाटील
आदिती तटकरे
धर्मरावबाबा अत्राम
अनिल पाटील