इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे ४, शिवसेना शिंदे गट व अजित पवार गटाचा प्रत्येक एक विधान परिषदेचा आमदार निवडून गेल्यामुळे आता महायुतीच्या ६ जागा रिक्त होणार असून त्यावर आता कुणाला सधी मिळते हे महत्त्वाचे आहे. यासाठी आतापासून लॅाबिंग सुरु झाली आहे.
भाजपचे विधान परिषदेवर असलेले चंद्रशेखर बाबनकुळे, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रविण दटके त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गटाचे आमश्या पाडवी व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटकर हे विद्यामान विधानपरिषदेचे आमदार विधानसभेत निवडून गेले आहे. त्यामुळे त्यांच्या या सहा जागा रिक्त होणार आहे. त्याचप्रमाणे राज्यपाल नियुक्त ४ जागा अजून रिक्त आहे. त्यामुळे एकुण १० जागेवर संधी मिळू शकते.
विधानसभा निवडणुकीत अनेक बंडखोरांना विधान परिषदेवर आमदार करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता कुणाल संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.