इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत महायुतीला २३० जागा मिळाल्या असून त्यात भाजप १३२ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला ५७ तर अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या आहे.
आता या नव्या सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा फॅार्म्युलावर चर्चा सुरु झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार भाजपला सर्वाधिक २१ मंत्रिपदे मिळू शकेल. तर शिवसेना शिंदे गटाला १२ व राष्ट्रवादी अजित पवार गटाला १० मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
दिल्लीत भाजपच्या वरीष्ठ नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासह मंत्रिमंडळाच्या बैठकीबाबत चर्चा होणार आहे. तूर्तास फॅार्म्युला काही असला तरी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे, अजित पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.