मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभेच्या निवडणुकांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्यामुळे जागा वाटपाचा महायुतीचा तिढा कायम आहे. त्यासाठी शुक्रवारी रात्री गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित होते.
या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात आला असून सर्वांची धावपळ या निमित्ताने समोर आली आहे. महायुतीमध्ये सर्वाधिक जागा भाजप लढणार असून त्या खालोखाल शिंदे गटाला जागा मिळणार आहे. त्यानंतर अजित पवार गटाला जागा दिल्या जाणार आहे.
येत्या काही दिवसात महायुतीच्या उमेदवारांची नावे घोषित केली जाणार आहे. त्यात कोणाला संधी मिळते. मित्र पक्षाला भाजप किती जागा सोडते या गोष्टी स्पष्ट होणार आहे.