इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महायुतीचे जागा वाटपाचे सूत्र निश्चित झाले असून एक दोन दिवसात त्याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. भाजपला १२६ जागा, शिंदे गटाला ९० जागा, अजित पवार गटाला ७२ जागा देण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या यांच्या उपस्थितीत हे जागा वाटपाचे सूत्र निश्चित झाल्याचे बोलेल जात आहे. शिंदे गटाने १०० हून अधिक जागांची मागणी केली होती. पण, त्यांना ९० जागेवरच समाधान मानावे लागणार आहे. तर अजित पवार गटाला ८० ते ८५ जागा हव्या होत्या. पण, त्यांच्या गटाला ७२ जागा देण्यात आल्या आहे. या जागेतूनच मित्र पक्षाला तिन्ही गट जागा देणार असल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असतांना सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहे. महायुतीने जागा वाटप अगोदर करुन थेट प्रचाराला उतरण्याची जोरदार तयारी केली आहे. लोकसभेत झालेला उशीर यावेळेस होऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे हे सूत्र निश्चित करण्यात आले आहे.