इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर येथे आज महायुतीचा मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. १६ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे सुरुवात होणार आहे. त्याअगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. या सोहळ्यात ३९ मंत्र्यांनी शपथ देण्यात आली. त्यात भाजपच्या १९ शिवसेनेचे ११तर राष्ट्रवादीचे ९ मंत्री यांनी आज शपथ घेतली. नाशिकमधून शिवसेनेकडून दादा भुसे तर राष्ट्रवादीकडून नरहरी झिरवाळ व माणिकराव ठाकरे यांनी शपथ घेतली. तर छगन भुजबळ यांना मात्र संधी मिळाली नाही. तर भाजपकडून नाशिक जिल्ह्यात कोणतेही नाव आले नाही.
भाजचे मंत्री (१९)
- चंद्रशेखर बाबनकुळे
- राधाकृ्ण विखे पाटील
- चंद्रकांत पाटील
- गिरीश महाजन
- गणेश नाईक
- मंगलप्रभात लोढा
- जयकुमार रावल
- पंकजा मुंडे
- अतुल सावे
- अशोक उईके
- आशिष शेलार
- शिवेंद्रराजे भोसले
- जयकुमार गोरे
- संजय सावकारे
- निलेश राणे
- आकाशु फुंडकर
- माधुरी मिसाळ
- पंकज भोयर
- मेघना बोर्डीकर
शिवेसना शिंदे गट (११)
- गुलाबराव पाटील
- दादा भुसे
- संजय राठोड
- उद्य सामंत
- शंभूराज देसाई
- संजय शिरसाट
- प्रताप सरनाईक
- भरत गोगावले
- प्रकाश आबिटकर
- आशिष जैस्वाल
- योगेश कदम
राष्ट्रवादी अजित पवार गट (९)
- हसन मुश्रीफ
- धनजंय मुंडे
- दत्तात्रय भरणे
- आदिती तटकरे
- माणिकराव कोकाटे
- नरहरी झिरवाळ
- मकरंज जाधव
- बाबासाहेब पाटील
- इंद्रनील नाईक
–