इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमाला वेग आला असून मुंबई एेवजी आता नागपूरात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात होणार असून त्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. आज सायंकाळी ४ वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे. १६ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे सुरुवात होणार आहे त्याअगोदर मंत्रिपदाचा विस्तार आज होणार आहे.
महायुतीमध्ये जागावाटपात भाजपला २०, राष्ट्रवादीला १० तर शिवसेनेच्या वाट्याला १२ मंत्रीपदे मिळणार आहे. त्यात शिवसेनेचे ११ तर राष्ट्रवादीचे ९ मंत्री आज शपथ घेणार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कोणत्या आमदारांना मंत्रिपदासाठी फोन करण्यात आले पहा संपूर्ण यादी….
भाजपचेमंत्री (१९)
शिवेंद्रराजे भोसले, निलेश राणे,चंद्रकांत पाटील, पंकज भोयर, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, राधाकृ्ण विखे पाटील, गणेश नाईक, मेघना बोर्डींकर, अतुल सावे, जयकुमार गोरे, माधुरी मिसाळ, संजय सावकारे, अशोक उईके, आशिष शेलार,
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री (११)
दादा भुसे,प्रताप सरनाईक, उद्य सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, योगेश कदम, आशिष जैस्वाल, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, संजय राठोड, संजय शिरसाट
राष्ट्रवादी अजित पवार गट मंत्री (१०)
आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तमामा भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक,