इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमाला वेग आला असून मुंबईएेवजी आता नागपूरात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. या विस्तारात भाजपचे २१, राष्ट्रवादीचे १० तर शिवसेनेच्या १२ मंत्र्याचा शपथविधी होईल. नागपूरात पहिल्यांदा हा मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. १५ डिसेंबर रोजी रविवारी हा शपथविधी सोहळा दुपारी ३ वाजता होणार आहे. १६ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे सुरुवात होणार असून त्यामुळे हे ठिकाण बदलल्याचे बोलले जात आहे.
दिल्लीत झालेल्या बैठकीत बुधवारी महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाला कोण कोणती खाती मिळणार हे ठरले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. खाते वाटपाचा तिढा सुटल्यामुळे महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी होण्याची शक्यता आहे.
भाजपकडे नगरविकास, गृह, सामान्य प्रशासन, ग्रामविकास, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, ओबीसी कल्याण ही खाती असणार आहे.शिवसेने शिंदे गटाच्या वाटयाला महसूल, सार्वजनिक बांधकाम खात्यासह शालेय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, कामगार, राज्य उत्पादन शुल्क, परिवहन, पाणी पुरवठा आणि स्वच्छता ही खाती दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, अन्न आणि नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, महिला आणि बालविकास, मदत आणि पुनर्वसन, अन्न आणि औषध प्रशासन ही खाती दिली जाणार आहे.
भाजपचे संभाव्य मंत्री (२१)
चंद्रशेखर बाबनकुळे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा, बबनराव लोणीकर, पंकजा मुंडे, आशिष शेलार किंवा योगश सागर, संभाजी निलंगेकर, जयकुमार रावल, शिवेंद्रराजे भोसले, निलेश राणे, विजयकुमार गावित, देवयानी फरांदे किंवा राहुल आहेर, राहुल कुल, माधुरी मिसाळ, संजय कुटे, गोपीचंद पडळकर
शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य मंत्री (१३)
दादा भुसे, उद्य सामंत, शंभूरजा देसाई, गुलाबराव पाटील, मंगेश कुडाळकर, अर्जुन खोतकर, भरत गोगावले, संजय शिरसाट, राजेश क्षीरसागर, आशिष जैस्वाल, प्रताप सरनाईक, प्रकाश सुर्वे, योगेश कदम, बालाजी किणीकर, प्रकाश आबिटकर
राष्ट्रवादी अजित पवागर गट संभाव्य मंत्री (९)
छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनजंय मुंडे, आदिती तटकरे, धर्मरावबाबा अत्राम, अनिल पाटील, माणिकराव कोकाटे, दत्ता भरणे, इंद्रनील नाईक, संग्राम जगताप, सुनील शेळके