शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विधानसभेसाठी भाजपचा अंतर्गत सर्व्हे…शिंदे गटाला १७-२२ जागा तर अजित पवार गट व भाजपला इतक्या जागा….या नेत्याने दिली माहिती

by India Darpan
सप्टेंबर 11, 2024 | 1:33 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
shinde fadanvis pawar1 e1710312448933

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपल्यामुळे आता विविध सर्व्हे समोर येऊ लागले आहे. त्यात काही सर्व्हे महायुतीचा कल दाखवतात तर काही सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण, अशाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत महायुतीच्या घटक पक्षाला किती जागा मिळेल हे सांगत खळबळ निर्माण केली आहे.

सोशल मीडियातील पोस्टमध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे की, एका internal source च्या माहितीनुसार परवाच भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला असून त्यामध्ये अजितदादांच्या गटाला ७-११ जागा, शिंदे साहेबांच्या गटाला १७-२२ जागा आणि भाजपला ६२-६७ जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्याने भाजपमध्ये अंतर्गत गोटात भीती पसरलीय. यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत.

भाजपच्या एका मोठ्या केंद्रीय नेत्याने परवा अजितदादांना काही ठराविक जागा ऑफर केल्या असून अजितदादांनी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठे नेते उभे केले किंवा अपक्ष उभे करण्याची तयारी दाखवली तर ६ ते ७ जागा अतिरिक्त देण्याचीही ऑफर दिलीय.

कर्जतजामखेड संदर्भात तर “कुछ भी कर के, अभी उसे वही पे रोको”, असं सांगितल्याने #कर्जतजामखेडची लढत राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि तेवढीच इंटेरेस्टिंग होणार हे नक्की आहे. पण मीही या #महाकाय शक्तीसोबत दोन हात करायला सज्ज असून या महायुद्धात कर्जत-जामखेडकर #स्वाभिमान आणि #निष्ठा काय असते, ते या महाशक्तीला दाखवून देतील, असा विश्वास आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वृध्दाच्या बँक खात्यातील पावणे दोन लाख लांबविले…एटीएम कार्डची आदलाबदल करुन घातला गंडा

Next Post

क्रेटा कार चालकास ग्रामिण पोलीसांनी अखेर ठोकल्या बेड्या…हे आहे कारण

Next Post
jail1

क्रेटा कार चालकास ग्रामिण पोलीसांनी अखेर ठोकल्या बेड्या…हे आहे कारण

ताज्या बातम्या

Governor releases book 01 51 1024x615 1

रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना…राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

जून 20, 2025
cm dharangaon 1024x684 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

जून 20, 2025
Untitled 68

लोकलमध्ये महिलांची हाणामारी, बघा, सोशल मीडियामधील व्हायरल व्हिडिओ

जून 20, 2025
jilha parishad

एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात नाशिक झेडपीत फसवणुकीचा गुन्हा

जून 20, 2025
DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011