इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्लीत महायुतीच्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाचा फॅार्म्युला ठरला असल्याचे बोलले जात आहे. महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाला कोण कोणती खाती मिळणार हे ठरले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. खाते वाटपाचा तिढा सुटल्यामुळे महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुढच्या काही तासांत होण्याची शक्यता आहे.
दिल्लीत शिवसेने शिंदे गटाच्या वाटयाल महसूल सार्वजनिक बांधकाम खात्यासह शालेय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, कामगार, राज्य उत्पादन शुल्क, परिवहन, पाणी पुरवठा आणि स्वच्छता ही खाती दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, अन्न आणि नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, महिला आणि बालविकास, मदत आणि पुनर्वसन, अन्न आणि औषध प्रशासन ही खाती दिली जाणार आहे. भाजपकडे नगरविकास, गृह, सामान्य प्रशासन, ग्रामविकास, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, ओबीसी कल्याण ही खाती असणार आहे.
१४ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यासाठी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर या खातेवाटपाची माहिती समोर आली.