इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदानावर मोठ्या दिमाखात पार पडला. अवघ्या १५ मिनीटात हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी. नड्डा, राजनाथसिंह, नितीन गडकरी, रामदास आठवडे यांच्यासह २६ राज्याचे मुख्यमंत्री उपस्थितीत होते.
या सोहळ्यात मुकेश अंबानी, गौतम अडाणी, अभिनेता शाहरुख खान, संजय दत्त, सलमान खान, सचिन तेंडुलकर यांच्यासह मान्यवर उपस्थितीत होते.
विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घडामोडी सुरु होत्या. पण, बुधवारी भाजपने विधिमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडवणीस यांची निवड केली. त्यानंतर महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर आज दिमाखदार सोहळा संपन्न झाला.