इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महायुतीच्या सत्तास्थापनेसाठी आज दुपारी भाजपच्या आमदारांची बैठक होणार असून त्यात भाजप गटनेता निवडला जाणार आहे. ही निवड झाल्यानंतर तिन्ही पक्षाचे नेते सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांकडे करणार आहे. याअगोदर शिवसेना शिंदे गटाने व अजित पवार गटाने विधीमंडळ नेत्याची निवड केली आहे. त्यामुळे तिन्ही नेते एकत्र सत्तास्थापनेचा हा दावा करणार आहे.
बुधवारी मुंबईत भाजपचे केंद्रीय निरीक्षक माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, निर्मता सितारमण हे आले आहे. आज त्यांच्या उपस्थितीत भाजप आमदारांची बैठक होणार आहे. त्यानंतर हे निरीक्षक महायुतीच्या दोन्ही मित्रपक्षाच्या नेत्यांबरोबरही चर्चा करणार आहे.
राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी सोहळा हा ५ डिसेंबर रोजी ५ वाजता आझाद मैदानावर पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घडामोडी सुरु होत्या. दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर हालचाली जोरात सुरु झाल्या. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितीत राहणार आहे. दरम्यान महाराष्ट्रचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी भाजपच्या गोटात देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे.
गुरुवारी झालेल्या बैठकीत महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्याचबरोबर या बैठकीत खातेवाटपावर चर्चा झाली. कोणत्या पक्षाला कोणत्या खात्याचं मंत्रिपद द्यावं, ते ठरवण्यात आले आहे. .