इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी सोहळा हा ५ डिसेंबर रोजी ५ वाजता आझाद मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्यात नाशिक जिल्ह्यातील तीन मंत्रीचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यात छगन भुजबळ, दादा भुसे व प्रा. देवयानी फरांदे यांचे नाव चर्चेत आहेत. महायुतीमधील तीन्ही पक्षांमधून हे तिन्ही मंत्री होणार असल्याचे बोलले जात आहे. भुजबळ व दादा भुसे यांचे नाव जवळपास निश्चित आहे. तर यावेळेस भाजप आगामी महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन नाशिक जिल्ह्याला भाजप प्रतिनिधीत्व देणार असल्याची चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घडामोडी सुरु होत्या. दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर काल शपथविधा सोहळ्याची माहिती काल अधिकृतपणे देण्यात आली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थिततीत राहणार आहे. दरम्यान महाराष्ट्रचा मुख्यमंत्री कोण होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी भाजपच्या गोटात देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे.
गुरुवारी झालेल्या बैठकीत महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्याचबरोबर या बैठकीत खातेवाटपावर चर्चा झाली. कोणत्या पक्षाला कोणत्या खात्याचं मंत्रिपद द्यावं, ते ठरवण्यात आले आहे. .