इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने बाकी असतांना महायुतीमधील वाद आता समोर येऊ लागले आहे. त्यामुळे सध्या महायुतीत महाभारत सुरु असल्याचे चित्र आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काळे झेंडे दाखवल्यामुळेव राष्ट्रवादी आणि भाजपात वाद पेटला आहे. तर कोकणात शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि भाजपचे नेते रविंद्र चव्हाण यांच्यात आरोप- प्रत्यारोप सुरु आहे. तर तिसरीकडे रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी एकमेकांवर आरोप केले आहे.
पहिला वाद मुंबई-गोवा महामार्गातील खड्ड्यांवरुन शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री म्हणत थेट राजीनाम्याचीच मागणी केली. त्यानंतर रवींद्र चव्हाणांनीही तोंड फोडण्याचा इशारा दिला. त्यानंतर फडणवीसांनी सुध्दा कान टोचले.
दुसरा वाद कर्जतच्या विधानसभेच्या जागेवरुन शिंदे गट आणि अजित पवारांचे नेत्यांमध्ये सुरु झाला आहे. शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी म्हणजे विश्वासघात करणारी पार्टी, जिल्ह्याचं नेतृत्व करणारेही विश्वासघातकी आहेत अशी टीका केली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महेंद्र थोरवे माझ्यासाठी दखल घेण्याचं पात्रतेचे नाहीत, मला काही फरक पडत नाही असे सांगितले.
महेंद्र थोरवे कर्जतचे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत. मात्र यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुधाकर घारेही इच्छुक आहेत. त्यावरुन हा वाद सुरु झाला आहे.
तिसरा वाद जुन्नरमध्ये भाजप पदाधिकारी आशा बुचकेंसह इतरांनी अजित पवार हाय-हायच्या घोषणा देत काळे झेंडे दाखवल्यामुळे सुरु झाला आहे. त्यानंतर अमोल मिटकरींनी फडणवीसांकडेच खुलासा करण्याची मागणी केली होती. त्यावरुन मुळिक यांनी, मिटकरींची लायकी काढत विचारजंत म्हटलं. ए मिटकरी, तुझी पात्रता आहे का? देवेंद्रजींना खुलासा मागण्याची? शेवटी तू बाजारु विचारजंतच, तुझी पात्रता तेवढ्याच डबक्यात राहणार अशी टीका जगदीश मुळीक यांनी केली. त्यामुळे हा वादही पेटला आहे.