स्वातंत्र्यदिनी महावितरणच्या २६ यंत्रचालक व तंत्रज्ञांचा गौरव
नाशिक: कोव्हीड १९ चा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन व निसर्ग चक्रीवादळाच्या या कालावधीत सुद्धा अनेक अडचणींवर मात करीत नेहमीप्रमाणे अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱयांनी उत्कृष्ठ कामगिरी बजाविली असून ही अखंडित सेवा कायमस्वरूपी ग्राहकांच्या स्मरणात राहील यापुढेही अशाच प्रकारे स्वतःची सुरक्षिततेची काळजी घेऊन अपघातविरहित व अखंडित सेवा देण्याचे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी केले, ते स्वातंत्र्यदिनी विद्युत भवन आवारात आयोजित गुणवंत कर्मचाऱ्यांच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात उपस्थिताना मार्गदर्शन करताना बोलत होते.
१५ ऑगस्ट २०२१ रोजी स्वातंत्र दिनानिमित्त विद्युत भवनाच्या प्रांगणात मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर नाशिक शहर मंडळातील २६ यंत्रचालक व तंत्रज्ञ यांचा गेल्या वर्षभरात केलेल्या विविध व विशेष कार्याबद्दल गुणवंत कामगार म्हणून मुख्य अभियंता व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्प देऊन गौरव करण्यात आला. दरवर्षी महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त होणारा हा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आला होता त्यानंतर स्वातंत्र्यदिनी सुरक्षिततेचे नियम पाळीत सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाला व्यासपीठावर अधिक्षक अभियंता संजय खंडारे व प्रेरणा बनकर(प्रभारी), सहा. महाव्यवस्थापक महेश बुरंगे उपस्थित होते.
“पुरस्कार हा पायरीसारखा असतो त्यामुळे पुढची पायरी गाठणायसाठी कंपनीचे व ग्राहकांचे हित जपत आणखी गतिमान व सौजन्यशील सेवा देऊन विशेष कामगिरी करावी” असेही शेवटी मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी आवाहन केले. तंत्रज्ञ व यंत्रचालक यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात पंडित कुमावत, दिपक कासव व नवनाथ दांगट यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला कोरोना आजारामुळे निधन झालेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना संमोहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाला सहाय्यक महाव्यवस्थापक दिनकर मंडलिक(प्रभारी), कार्यकारी अभियंते धनंजय आहेर, मनीष ठाकरे, राजाराम डोंगरे, धनंजय दीक्षित, माणिकलाल तपासे व निलेश चालीकवार, उपमुख्य सहा. विधी अधिकारी प्रशांत लहाने, व्यवस्थापक मंगेश गाढे यांचेसह मोजके अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी तर उपमुख्य संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले. सोबतच नाशिक परिमंडळातील मालेगाव मंडळ कार्यालय येथे अधिक्षक अभियंता रमेश सानप यांचे हस्ते १६ तांत्रिक कर्मचाऱ्यांना तर अहमदनगर मंडळ कार्यालय येथे २७ तांत्रिक कर्मचाऱ्यांना अधिक्षक अभियंता(प्रभारी) प्रकाश जमदाडे यांचे हस्ते पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
नाशिक मंडळ गुणवंत पुरस्कारप्राप्त कर्मचारी- यंत्रचालकाची नावे व कंसात ३३/११ उपकेंद्र- पंडित कुमावत (गंगापूररोड), दिपक कासव (मुंगसरा), शिवदास पवार (सुरगाणा), योगेश पवार (पालखेड). तंत्रज्ञ नावे व कंसात कार्यालय – फकिरा जाधव (मखमलाबाद नाका कक्ष), राजू नवले (गंगापूररोड कक्ष), अमित भामरे (नाशिक अंबड कक्ष), सचिन लिटे (नाशिक द्वारका कक्ष १), युसुफखान पठाण (द्वारका कक्ष २), तुळशीदास पंढरी (नाशिक ग्रामीण उपविभाग), जिभाऊ करडे (सैय्यदपिंप्री कक्ष), भूषण जाधव (देवळाली गाव कक्ष), महेश लांडगे (पॉवर हाऊस कक्ष २), वैभव तरवाडे (सातपूर ग्रामीण कक्ष), मंगेश गायकवाड (पेठ कक्ष), दत्तू काळे (चांदोरी ग्रामीण कक्ष), रवींद्र आहिरे (वणी ग्रामीण कक्ष), नवनाथ दांगट (सिन्नर ग्रामीण कक्ष १), रामचंद्र गोडे (इगतपुरी ग्रामीण कक्ष), मुरलीधर जाधव (सुरगाणा कक्ष), राहुल वारुंगसे (वडांगळी कक्ष), सुदर्शन शिंदे (विंचुर कक्ष), कैलास आहेर (पिंपळगाव शहर कक्ष), श्रीधर दुधाने (उगाव कक्ष), प्रवीण चव्हाण (चांदवड शहर कक्ष), पंकज बाहेकर (नाशिक शहर चाचणी विभाग).
मालेगाव मंडळ गुणवंत पुरस्कारप्राप्त कर्मचारी- यंत्रचालकाची नावे व कंसात ३३/११ उपकेंद्र- निवृत्ती भोये (निरपूर), हेमंत देवरे (दहिवळ), ललित वाघ (दाभाडी), संजय बच्छाव (बाणगाव).तंत्रज्ञ नावे व कंसात कार्यालय – अमोल वाघ (नामपूर ग्रामीण कक्ष), ताराचंद जाधव (सटाणा ग्रामीण २ कक्ष), संदीप आहेर (देवळा शहर कक्ष), मोहन पवार (कळवण ग्रामीण कक्ष २), निलेश सूर्यवंशी (रावळगाव कक्ष), चंद्रकांत पगार (चंदनपुरी कक्ष), किशोर पाटील (निमगाव कक्ष), प्रकाश पवार (मनमाड ग्रामीण कक्ष १), नितीन शिंदे (नगरसूल कक्ष २), संदिप जाधव (येवला ग्रामीण कक्ष २), अंतूलाल भास्कर (न्यायडोंगरी कक्ष), प्रशांत बच्छाव (नाशिक ग्रामीण चाचणी विभाग).