अचूक देयकासाठी महावितरणची सुविधा
नाशिक : महावितरणच्या नाशिक व मालेगाव मंडलात मुसळधार पाऊस, पूर वा कुठल्याही कारणास्तव ग्राहकांच्या वीज मीटरचे रिडींग घेण्यासाठी मीटर रीडर पोहचणे शक्य न झाल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या सर्व ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर ‘एसएमएस’ द्वारे सूचित करण्यात येत असून या सर्व ग्राहकांनी त्यांच्या मीटर रीडिंगचे फोटो मोबाईल अँपच्या (MAHAVITARAN APP) माध्यमातून स्वतः सबमिट करावेत तसेच मोबाईल क्रमांक नोंदणीकृत नसलेले ग्राहक सुद्धा मोबाईल अँपद्वारे वीज मीटरचे रिडिंग व फोटो पाठवु शकतात. ज्यामुळे योग्य व अचूक वीज देयक ग्राहकांना प्राप्त करता येईल, तरी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरणच्या ग्राहकांना दरमहा वापरलेल्या विजेचे देयक देण्यात येते, हे देयक त्याच्या वीज मीटरवर असलेल्या रिंडींग च्या आधारावर देण्यात येत असते त्यामुळे मीटर रिडींग अचूक प्राप्त झाल्यास देयक सुद्धा अचूकचं असते, मात्र कुठल्याही कारणास्तव रिडींग प्राप्त झाले नाही वा सदोष असले तर देयक सुद्धा सरासरी वापरानुसार असू शकते. महावितरणच्या मोबाईल अँपव्दारे ग्राहक घरबसल्या आता आपले मिटर रिडींग पाठवू शकतात आणि रिडींगनुसारच देयक प्राप्त करू शकतात. ज्या ग्राहकांचे मोबाईल नंबर महावितरण कडे नोंदलेले आहेत त्यांना रिडींग सबमिट करण्यासाठी संदेश मिळाल्यानंतर रिडींग पाठवू शकतात, ज्या ग्राहकांचे मोबाईल नंबर महावितरणकडे नोंदणी झालेले नसतील त्यांना मेसेज पाठविला जाणार नाही त्यांनी आपल्या मागील महिन्याच्या किंवा जुन्या बिलावरील चालू महिन्याचे रिडींग तारीख बघावी म्हणजे त्या तारखेच्या किमान एक दिवस आधीपासून असे पाच दिवसात रिडींग सबमिट करू शकतात. यासाठी ग्राहकास बारा अंकी ग्राहक क्रमांक आवश्यक आहे.
रिडींग कसे पाठवावे-
ग्राहकांनी सर्वात प्रथम गुगल प्ले स्टोअरवरून महावितरण अँप डाऊनलोड करावे. त्यामधील Guest Users मधून सुद्धा ग्राहक रिडींग सबमिट करू शकतात. ज्यांना महावितरण कडून मोबाईलवर संदेश येत नसतील त्यांनी अँप डाउनलोड करून नोंदणी करणे अनिवार्य आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी Dont have account? Sign Up या ऑपशन वर क्लिक करून १२ अंकी ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी लॉगिन नेम आणि पासवर्ड टाकावा. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर SUBMIT READING या टॅब मधून दिलेल्या मुदतीत ग्राहक रिडींग सबमिट करावे. आपल्या मीटरवरील KWH रिडिंग दर्शविलेले असेल ते रिडींग सबमिट करावे. तसेच आपले मागील महिन्याचे बिलावरील चालू रिडींगशी तुलना करून घ्यावी. (मागील महिन्यातील रिडींगपेक्षा सद्याची रिडिंग संख्या जास्त असायला हवी.) यामुळे रिडींग व वापराबद्दल शंका न राहता आपल्या वापराबद्दल व देयकाबाबत निश्चितता येऊन दुरुस्तीसाठी महावितरणच्या कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. यासाठी ग्राहकांनी त्यांचे मोबाईल क्रमांक नोंदणी करावी आणि कुठल्याही तक्रारीसाठी १९१२ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा. प्रत्यक्ष वीज वापरानुसार योग्य वीजबिल देणे शक्य व्हावे यासाठी ग्राहकांनी त्यांच्या मीटर रीडिंगचे फोटो मोबाईल अँपच्या माध्यमातून स्वतःहून सबमिट करावेत, त्यामुळे ग्राहकांना वास्तविक वापराचे व अचूक वीज बिल देण्यास मदत होईल. तरी मीटर रीडर पोहचणे शक्य न झाल्यास या सुविधेचा ग्राहकांनी वापर करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.