रविवार, ऑगस्ट 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

२९ हजार थकबाकीदार ग्राहकांना महावितरणची तडजोडीची संधी…अशी आहे अभय योजना

by Gautam Sancheti
सप्टेंबर 27, 2024 | 3:49 pm
in राज्य
0
mahavitarn

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वीज बिल थकल्यामुळे मार्च २०२४ पुर्वी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या जिल्ह्यातील २९ हजार ९९ वीज ग्राहकांच्या प्रकरणांचा निपटारा तडजोडीच्या माध्यमातून लोकअदालत मध्ये आज करण्यात येणार आहे, जिल्हा तथा तालुका विधी सेवा प्राधिकरणाकडून (शनिवार २८ सप्टेंबर) जिल्हा आणि तालुकास्तरीय दिवानी आणि फौजदारी न्यायालयात आयोजित “लोक अदालत” मध्ये दाखलपूर्व असलेली आणि कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेली २९ हजार ९९ प्रकरणे ३५ कोटी ८४ लाख रूपयाच्या तडजोडीसाठी महावितरणने ठेवली आहेत . जिल्ह्यात होणाऱ्या “राष्ट्रीय लोक अदालत” मध्ये सहभाग नोंदवून तडजोडीने वाद मिटवावा आणि महावितरणच्या व्याज आणि विलंब आकाराच्या माफीचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.

राष्ट्रीय लोक अदालतीत सहभाग नोंदविणाऱ्या महावितरणच्या लघुदाब आणि उच्चदाब ग्राहकांना महावितरण अभय योजना २०२४ च्या सर्व सवलती लागू राहणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने १००% मुद्दल रक्कम भरणाऱ्या थकबाकीदार ग्राहकांना व्याज आणि विलंब आकाराची माफी मिळणार आहे. सोबत वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या तारखेपासून तर अर्जाच्या तारखेपर्यंत कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. याशिवाय थकबाकीदार ग्राहकांने मुद्दल रक्कम एकरकमी भरल्यास उच्चदाब वर्गवारितील ग्राहकांना ५% आणि लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांना १०% अतीरिक्त सवलतीचे प्रावधान आहे. याशिवाय ३०% डाऊन पेमेंट भरून उर्वरित मुद्दल थकबाकी ६ हप्त्यात भरण्याचे प्रावधानही करण्यात आले आहेत.

याशिवाय मार्च २०२४ पूर्वी वीज पुरवठा खंडित असलेल्या आणि लोकअदालतीची नोटीस न मिळालेल्या वीज ग्राहकांनाही महावितरणची अभय योजना २०२४ लागू असून त्यांनी आपली थकबाकी महावितरणची कार्यालये तसेच महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर जाऊन भरण्याची सोय देखील करण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्यात महावितरणकडून नोटीस पाठविण्यात आलेल्या ग्राहकांमध्ये नाशिक मंडळातील १९ हजार ९२८ ग्राहकांकडे १९ कोटी ०३ लाख रुपये तर मालेगांव मंडळातील ९ हजार १७१ ग्राहकांकडे १६ कोटी ८१ लाख रुपये थकबाकी आहे. तरी संबंधित थकबाकीदार ग्राहकांनी सहभाग नोंदवावा यासाठी मुख्य अभियंता यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्याच्या विधी विभागाकडून या सर्व ग्राहकांना नोटीस देण्यात आली आहे. “राष्ट्रीय लोक अदालत” मध्ये सहभाग नोंदवून तडजोडीने वाद मिटवावा आणि महावितरणच्या व्याज आणि विलंब आकाराच्या माफीचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अंगणवाडी कर्मचा-यांचा आक्रमक पवित्रा… संपूर्ण राज्यात १ ऑक्टोबरला चक्का जाम करणार

Next Post

भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीवर डबलसिट प्रवास करणारा ठार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, ३१ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 30, 2025
manoj jarange
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांनी दिली आणखी एक दिवसाची मुदतवाढ…

ऑगस्ट 30, 2025
udhav 11
महत्त्वाच्या बातम्या

उध्दव ठाकरेंचा मनोज जरांगे पाटील यांना फोन…दीड ते दोन मिनिट चर्चा

ऑगस्ट 30, 2025
Gzl81fKWwAE3m6S 1920x1091 1
महत्त्वाच्या बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन….

ऑगस्ट 30, 2025
Untitled 49
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांची शिंदे समितीने घेतली भेट…झाली ही चर्चा

ऑगस्ट 30, 2025
crime1
क्राईम डायरी

जुन्या वादातून तरूणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली, तरुण जखमी…गुन्हा दाखल

ऑगस्ट 30, 2025
Raj Thackeray1 2 e1752502460884
महत्त्वाच्या बातम्या

गेल्यावेळेस प्रश्न सोडवला होता ना, मग परत मराठा आंदोलन का? एकनाथ शिंदे यांना विचारा….राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

ऑगस्ट 30, 2025
Untitled 48
राज्य

महाराष्ट्राचा विविध कंपन्यांशी १७ सामंजस्य करार…३४ हजार कोटींचा गुंतवणूक, ३३ हजार रोजगार निर्मिती

ऑगस्ट 30, 2025
Next Post
accident 11

भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीवर डबलसिट प्रवास करणारा ठार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011