गुरूवार, सप्टेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक जिल्ह्यात ३ लाख २७ हजार ग्राहकांकडे २४३ कोटीची थकबाकी

by Gautam Sancheti
सप्टेंबर 27, 2024 | 1:27 pm
in स्थानिक बातम्या
0
mahavitarn

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यात ३ लाख २७ हजार ग्राहकांकडे २४३ कोटी १५ लाख रुपये थकबाकी असून थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी नाशिक जिल्ह्यातील शनिवार व रविवारी २८ व २९ सप्टेंबर २०२४ या साप्ताहिक सुटीच्या दिवशीही अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु असणार आहे. सुविधेसह डिजिटल माध्यमातून ग्राहकांनी आपल्या चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

नाशिक जिल्ह्यातील नाशिक व मालेगांव मंडळात २ लाख ७७ हजार ५०० घरगुती ग्राहकांकडे ३२ कोटी ७८ लाख रुपये, ३३ हजार ३७६ वाणिज्यीक ग्राहकांकडे ११ कोटी ९४ लाख, ४ हजार ५०२ औद्योगिक ग्राहकांकडे ६ कोटी ३५ लाख, ४ हजार ६५ पथदिवे ग्राहकांकडे १३० कोटी ३४ लाख, २ हजार १२ पाणीपुरवठा ग्राहकांकडे ५७ कोटी २२ लाख, ३ हजार ८९० सार्वजनिक सेवा ग्राहकांकडे ३ कोटी ९९ लाख आणि इतर १६६० ग्राहकांकडे ५२ लाख रुपये थकबाकी आहे. अशी एकूण जिल्ह्यात ३ लाख २७ हजार ५ ग्राहकांकडे २४३ कोटी १५ लाख रुपये थकबाकी असून थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे.

ग्राहकांच्या सोयीसाठी वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्यासोबतच थकीत वीजबिल वसुलीसाठीची कारवाई सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार आहे. थकबाकीदार ग्राहकांनी वीज पुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी आपल्या विदुयत बिलाचा भरणा वेळेत करावा. अधिकृत वीजबिल भरणा केंद्राशिवाय महावितरणच्या मोबाईल अँप (App) वर वीजबिल भरणा तसेच इतर सर्व सुविधा उपलब्ध आहेत. www.mahadiscom.in या संकेतस्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आदींच्या माध्यमातून वीजबिल भरता येते. याशिवाय बाजारात उपलब्ध असलेल्या विविध पेमेंट वॉलेटचा (पेटीएम, गूगल पे) उपयोग करून घरबसल्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा आहे. तसेच वीजबिलावर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट पेमेंट गेटवेवर जाऊन वीजबिल भरणे सुलभ होते, या डिजिटल माध्यमांचा वापर करून घरबसल्या वीजबिल भरता येईल. अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे निधन…

Next Post

‘मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास या तारखेपर्यंत मुदतवाढ

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

आता दिवसाला ९ तासांऐवजी १२ तास काम, सुट्टीचेही निकष बदलले, मंत्रिमंडळाची मान्यता

सप्टेंबर 4, 2025
crime 71
क्राईम डायरी

नाशिकमध्ये जुन्या वादाची कुरापत काढून तरूणाचा खून….पाच जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सप्टेंबर 4, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
राज्य

मुंबईसाठी २३८ वातानुकूलित लोकल गाड्यांच्या खरेदीसाठी ४ हजार ८२६ कोटी रुपयांस मंजुरी….तर पुण्यासाठी हा निर्णय

सप्टेंबर 4, 2025
Untitled
संमिश्र वार्ता

औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील राखेच्या वापरासंबंधी धोरणास मान्यता…

सप्टेंबर 4, 2025
प्रातिनिधिक संग्रहित फोटो
संमिश्र वार्ता

विशेष लेख…ग्रामीण शेत रस्त्यांना कायदेशीर ओळख देणारा सकारात्मक शासननिर्णय !

सप्टेंबर 4, 2025
farmer
महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांच्या खात्यांवर लवकरच हा निधी जमा होणार…९२ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना लाभ

सप्टेंबर 4, 2025
Maharashtra Police e1705145635707
महत्त्वाच्या बातम्या

‘पीएसआय’ पदांसाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू…पोलिस कर्मचाऱ्यांना अधिकारी होण्याची सुवर्णसंधी

सप्टेंबर 4, 2025
nirmal sitaraman
मुख्य बातमी

जीएसटीच्या स्लॅबमध्ये मोठा बदल…बघा, कोणत्या वस्तू होणार स्वस्त

सप्टेंबर 4, 2025
Next Post
IMG 20240906 WA0469 e1725720919551

‘मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास या तारखेपर्यंत मुदतवाढ

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011