अजय सोनवणे
मनमाड-मनमाड-नांदगाव रस्त्यावर असलेल्या बुरकुलवाडी येथील महावितरणच्या सब-स्टेशन मधील परिसरातील गवताला दुपारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. बुरकुलवाडी सब-स्टेशन मधून मनमाड शहरासह परिसरातील अनेक गावांना विद्युत पुरवठा होत असतो. आग लागल्याची घटना समजताच मनमाडच्या अग्निशामक दलाला याची माहिती देण्यात आली. अग्निशामक येताच काही ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. अग्निशामक दलाचे प्रमुख जॉर्ज स्वामी आणि त्यांच्या सहका-यांनी तातडीने घटनास्थळी पोहचत सब,स्टेशन मध्ये लागलेली आग आग पूर्ण;त विझविली.सुदैवाने यात कुठलाही मोठा अनुचित प्रकार घडला नाही. सब स्टेशनच्या मोठ्या परिसरात ही आग मात्र कशाने लागली हे मात्र समजू शकले नाही.