गुरूवार, डिसेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक परिमंडलात मार्चमध्ये १२ हजार ३६० थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत; ७७८ कोटी रुपये थकबाकी

मार्च 25, 2022 | 6:26 pm
in स्थानिक बातम्या
0
mahavitran

 

वीजबिले वेळेत भरून सहकार्य करावे; महावितरणचे आवाहन
नाशिक – महावितरणच्या नाशिक परिमंडलातील घरगुती, औदयोगिक, वाणिज्यिक, पाणीपुरवठा, पथदिवे व ईतर वर्गवारीच्या ६ लाख १८ हजार ग्राहंकांकडे सद्यस्थितीत जवळपास ७७८ कोटी ३९ लाख रुपये थकबाकी असुन, महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर असल्याने ही थकबाकी वसूली करण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम या मार्च महिन्यात सुरु आहे. या मोहिमेमध्ये वीज बिलांच्या थकबाकीमुळे नाशिक परिमंडलात मार्च २२ या महिन्यात १२ हजार ३६० थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे सदर ग्राहकांना पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करून घ्यायचा असेल तर त्यांना नियमानुसार एकूण थकबाकीसह पुनर्रजोडणी शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे गैरसोय आणि कटू प्रसंग टाळण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांनी वीज देयकांचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडलाच्या वतीने करण्यात आले आहे.

महावितरणच्या नाशिक मंडळाअंतर्गत घरगुती वर्गवारीतील एकूण २ लाख ३३ हजार १३९ ग्राहकांकडे २२ कोटी १५ लाख, वाणिज्यिक वर्गवारीतील २६ हजार २५१ ग्राहंकांकडे ८ कोटी ६३ लाख रुपये, औद्योगिक वर्गवारीतील ५ हजार ११० ग्राहकांकडे ९ कोटी ८७ लाख रुपये, पथदिवे वर्गवारीतील २ हजार ६९८ ग्राहकांकडे १३९ कोटी, पाणीपुरवठा योजनेतील १ हजार १७ ग्राहकांकडे २३ कोटी २१ लाख, सार्वजनिक सेवा योजनेतील १ हजार ८३० ग्राहकांकडे २ कोटी १० लाख, इतर वर्गवारीतील १ हजार ५३ ग्राहकांकडे ७० लाख असे एकूण नाशिक मंडळातील या सर्व वर्गवारीतील २ लाख ७१ हजार ९८ ग्राहकांकडे २०५ कोटी ६५ लाख रुपये थकबाकी आहे.

मालेगाव मंडळाअंतर्गत घरगुती वर्गवारीतील एकूण ६६ हजार २७४ ग्राहकांकडे ५ कोटी १७ लाख, वाणिज्यिक वर्गवारीतील ४ हजार ६६६ ग्राहंकांकडे १ कोटी ३० लाख रुपये, औद्योगिक वर्गवारीतील १ हजार ६९४ ग्राहकांकडे १ कोटी १० लाख रुपये, पथदिवे वर्गवारीतील १ हजार ३४६ ग्राहकांकडे ८८ कोटी ७६ लाख, पाणीपुरवठा योजना ६६१ ग्राहकांकडे १७ कोटी ४६ लाख, सार्वजनिक सेवा योजनेतील ९१२ ग्राहकांकडे ८४ लाख, इतर वर्गवारीतील ६६२ ग्राहकांकडे १० लाख असे एकूण मालेगाव मंडळातील सर्व वर्गवारीतील ७६ हजार १७५ ग्राहकांकडे ११४ कोटी ७२ लाख रुपये थकबाकी आहे. तर अहमदनगर मंडळात वरील सर्व वर्गवारीतील २ लाख ७० हजार ८०३ ग्राहकांकडे ४५८ कोटी २ लाख रुपये थकबाकी आहे अशी एकूण नाशिक परीमंडलात एकूण ६ लाख १८ हजार ७६ ग्राहकांकडे ७७८ कोटी ३९ लाख रुपये थकबाकी आहे.

दरमहा सातत्याने पाठपुरावा करून ग्राहकांना नित्यनेमाने संपर्क करून सुद्धा वीजबिलांची थकबाकी महावितरणसाठी चिंतेचा विषय आहे. फेब्रुवारी महिन्यात सुद्धा नाशिक आणि मालेगाव मंडळात ८ हजार ९४३ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली होती. ग्राहकांना वेळेत वीज बिल भरता यावे तसेच ग्राहकांच्या वीज वापराबाबत व बिलाबाबत पारदर्शकता यावी यासाठी ग्राहका़नी नोंदणी केलेल्या मोबाईलवर मीटर रिडी़ग वीज बिलाचे व इतर आनुषंगिक संदेश दिले जातात, पण तरीही पूर्ण महिना विजेचा वापर केल्यानंतर मिळालेले देयक भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने थकबाकीदार ग्राहकांविरोधात नाईलाजास्तव कठोर पाऊले घेत वसूली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मागील महिन्याप्रमाणे फेब्रुवारी व मार्च महिन्यात सुद्धा सदर मोहीम राबविली जात आहे. यासोबतच थकबाकीदार ग्राहकांनी वेळेत देयकांचा भरणा न केल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्यापूर्वी विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वा ईमेलवर वीज पुरवठा खंडित करण्याबाबतची नोटीस पाठविली जात आहे. या नोटीसचा विहित कालावधी संपताच ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केल्या जाणार आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर सदर ग्राहकाने वीज देयकाच्या थकबाकीची रक्कम व ग्राहक वर्गवारीनुसार पुनर्रजोडणी शुल्क (जीएसटीसह) भरल्यानंतर भौगोलिक भागानुसार साधारणतः पुढील २४ तास अवधीपर्यंत त्या ग्राहकांचा वीज पुरवठा पुर्ववत जोडणी करण्यास लागू शकतो. त्यामुळे गैरसोय आणि कटू प्रसंग टाळण्यासाठी ग्राहकांनी महावितरणच्या वीज देयकांचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सिन्नर – पतीच्या निधनानंतर पाचच दिवसात पत्नीचे निधन; मनेगावमध्ये हळहळ

Next Post

नाशिक – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
carona 11

नाशिक - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011