नाशिक – महावितरण कंपनीने वीजचोरीविरुध्द धडक मोहिम उघडली असून दोन घरमालका विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फकीरवाडी भागात वीजमीटरमध्ये फेरफार केल्याप्रकरणी अब्दुल शहा गफूर शहा व साहेबखान युसूफखान पठाण (रा. दोघे फकीरवाडी) यांच्या विरुध्द कारवाई केली आहे. महावितरण कंपनीचे तेजसकुमार सुर्यवंशी यांनी या वीजचोरी प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
या चोरी प्रकरणात अब्दुल शहा गफूर शहा यांच्या घऱगुती वीज वापराचे मीटरला मागील बाजूला छिद्र पाडून मीटरमध्ये छेडछाड करण्यात आल्याचे समोर आले आहे. या मीटर छेडछाडीतून १२ नोव्हेंबर १९ ते १२ नोव्हेंबर २१ दरम्यान ५४ हजार ३२२ रुपयांची ३५५८ युनीट वीज चोरी केल्याचे समोर आले आहे. तर दुसऱ्या घटनेत साहेबखान युसुफखान पठाण यांच्या घरामध्ये याच पद्दतीने १२ नोव्हेंबर २०१९ ते १२ नोव्हेंबर २०२१ दरम्यान वीज मीटर मध्ये छेडछेड करण्यात आली आहे. त्यांच्याविरुध्द १४ हजार २२२ रुपयांची ११४० युनीट वीज चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.