ग्राहकांनी सहकार्य करण्याचे महावितरणचे आवाहन
नाशिक –दरवर्षी महावितरणकडून मान्सूनपूर्व आगमनाअगोदर विद्युत यंत्रणेची देखभाल व दुरुस्तीची कार्ये केली जातात, यामध्ये विद्युत यंत्रणेला लागलेल्या झाडाच्या फांद्या काढण्यासह वाहिन्या व यंत्रणेची देखभाल दुरुस्ती यासह नियोजन करून इतर महत्वाची कामे केली जातात जेणेकरून पावसाळ्यामध्ये ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही. नाशिक परिमंडलात ही कामे गतीने सुरू असून त्यामुळे ग्राहकांची तात्पुरती गैरसोय होत असली तरी पावसाळ्यामध्ये ग्राहकांना अखंडीत वीज मिळावी म्हणूनच ही कामे केली जातात. तरी ग्राहकांनी संयम राखून या काळात सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे
कोव्हीड १९ च्या विषाणूच्या प्रादुर्भावापासून संरक्षण करण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली असून त्यामध्ये सर्व नागरिक घरी असून, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी फक्त सेवेत आहेत. त्यामुळे कुठलाही वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी या महामारीच्या स्थितीत महावितरणचे कर्मचारी सातत्याने कार्यरत आहेत. परंतु विद्युत यंत्रणांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम करायचे असल्यास सदर कार्य करण्यासाठी त्या भागातील वीजपुरवठा खंडित करावाच लागतोच, त्यामध्ये सर्व भागच वा विद्युत वाहिनी खंडित न करता टप्प्याटप्प्याने कामे करून तेवढाच भाग खंडित करून त्या भागातील दुरुस्ती कामे केली जातात. ही कामे पावसाळ्यामध्ये ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होऊन जास्त वेळ बंद राहू नये म्हणून उंच वाढत असलेल्या झाडाच्या फांद्या विद्युत यंत्रणेला स्पर्श करीत असेल तर त्या फांद्या तोडणे, फुटलेले पीन आणि इंसुलेटर बदलणे, तपासणी व दुरुस्त करणे, रोहीत्रांचे ऑईल तपासणी, ऑइल गळती थांबवणे,वाहिनींचे खराब झालेले लाईटनिंग अरेस्टर बदली करणे, भूमिगत वाहनांचे तात्पुरती असलेले जॉईट कायमस्वरूपी करणे, वाहिन्यांचे खराब झालेले जंपर बदली,जीर्ण झालेल्या वायर बदल, जळालेल्या तुटलेल्या वायर बदल, उपकेंद्रातील सर्व यांत्रिक बाबीची व यंत्रणा यांची तपासणी करणे व त्याची दुरुस्ती करणेतसेच प्रत्यक्ष वेळेवर आढळणाऱ्या त्रुटी दीर करून अशा प्रकारची अनेक कामे गतीने केली जातात. मात्र सदर कामे गतीने करीत असताना काही काळासाठी वीजपुरवठा खंडित केला जातो.