नाशिक – महावितरणच्या नाशिक परिमंडलातील घरगुती, औदयोगिक, वाणिज्यिक, पाणीपुरवठा, पथदिवे व ईतर वर्गवारीच्या 7 लाख 29 हजार ग्राहंकांकडे सद्यस्थितीत जवळपास 855 कोटी 40 लाख रुपये थकबाकी असुन, महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर असल्याने ही थकबाकी वसूली करण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु आहे. या मोहिमेमध्ये वीज बिलांच्या थकबाकीमुळे परिमंडलात ऑगस्ट 21 या महिन्यात 10 हजार 260 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला असून सदर ग्राहकांना पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करून घ्यायचा असेल तर त्यांना नियमानुसार एकूण थकबाकीसह पुनर्रजोडणी शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे गैरसोय आणि कटू प्रसंग टाळण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांनी वीज देयकांचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडलाच्या वतीने करण्यात येत आहे.
नाशिक मंडळाअंतर्गत घरगुती वर्गवारीतील एकूण 2 लाख 81 हजार ग्राहकांकडे 67 कोटी 32 लाख, वाणिज्यिक वर्गवारीतील37 हजार ग्राहंकांकडे 19 कोटी 56 लाख रुपये,औद्योगिक वर्गवारीतील 2 हजार890 ग्राहकांकडे6 कोटी 36 लाख रुपये, पथदिवे वर्गवारीतील 2 हजार 717 ग्राहकांकडे 170कोटी 42लाख, पाणीपुरवठा योजनेतील1 हजार 36ग्राहकांकडे20 कोटी 74 लाख तसेच मालेगाव मंडळाअंतर्गत घरगुती वर्गवारीतील एकूण 72 हजार 701ग्राहकांकडे 13 कोटी 26 लाख, वाणिज्यिक वर्गवारीतील 5 हजार ग्राहंकांकडे 1कोटी 80 लाख रुपये, औद्योगिक वर्गवारीतील 796 ग्राहकांकडे 76 लाख रुपये, पथदिवे वर्गवारीतील 1 हजार 137 ग्राहकांकडे 58 कोटी 27 लाख, पाणीपुरवठा योजना 536 ग्राहकांकडे 14 कोटी 82 लाख तर अहमदनगर मंडळात वरील सर्व वर्गवारीतील 3लाख 18 हजार ग्राहकांकडे 477 कोटी रुपये थकबाकी आहे अशी एकूण नाशिक परीमंडलात एकूण 7 लाख 29 हजार ग्राहकांकडे 855 कोटी 40 लाख रुपये थकबाकी आहे.
दरमहा सातत्याने पाठपुरावा करून ग्राहकांना नित्यनेमाने संपर्क करून सुद्धा वीजबिलांची थकबाकी महावितरणसाठी चिंतेचा विषय आहे. ग्राहकांना वेळेत वीज बिल भरता यावे तसेच ग्राहकांच्या वीज वापराबाबत व बिलाबाबत पारदर्शकता यावी यासाठी ग्राहका़नी नोंदणी केलेल्या मोबाईलवर मीटर रिडी़ग ,वीज बिलाचे व इतर आनुषंगिक संदेश दिले जातात, पण तरीही पूर्ण महिना विजेचा वापर केल्यानंतर मिळालेले देयक भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने थकबाकीदार ग्राहकांविरोधात नाईलाजास्तव कठोर पाऊले घेत वसूली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मागील महिन्याप्रमाणे सप्टेंबर महिन्यात सुद्धा सदर मोहीम राबविली जात आहे. यासोबतच थकबाकीदार ग्राहकांनी वेळेत देयकांचा भरणा न केल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्यापूर्वी विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वा ईमेलवर वीज पुरवठा खंडित करण्याबाबतची नोटीस पाठविली जात आहे. या नोटीसचा विहित कालावधी संपताच ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केल्या जाणार आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर सदर ग्राहकाने वीज देयकाच्या थकबाकीची रक्कम व पुनर्रजोडणी शुल्क (जीएसटीसह ) रूपये 236 (सिंगल फेज घरगुती ग्राहक ) भरल्यानंतर भौगोलिक भागानुसार साधारणतः पुढील 24 तास अवधीपर्यंत त्या ग्राहकांचा वीज पुरवठा पुर्ववत जोडणी करण्यास लागू शकतो. त्यामुळे गैरसोय आणि कटू प्रसंग टाळण्यासाठी ग्राहकांनी महावितरणच्या वीज देयकांचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.