गुरूवार, नोव्हेंबर 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

महावितरणने पाच महिन्यांत उपलब्ध करुन दिले १५ लाख वीजमीटर; ५ लाखांवर नवीन वीजजोडण्या

ऑगस्ट 24, 2021 | 5:58 pm
in राज्य
0
mahavitran

मुंबई – गेल्या दीड वर्षांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमिवर निर्माण झालेला वीजमीटरचा तुटवडा परिणामी नवीन वीजजोडण्यांची मंदावलेली गती यावर महावितरणने धडक निर्णय घेत यशस्वी मात केली आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये सिंगल व थ्रीफेजचे तब्बल १५ लाख ७६ हजार नवीन मीटर मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर उच्च व लघुदाबाच्या ५ लाख १८ हजारांवर नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

मागील वर्षी, मार्च २०२०मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतरचा लॉकडाऊन तसेच इतर कारणांमुळे वीजमीटर उपलब्धता कमी होत गेली. त्यामुळे नवीन वीजजोडण्या देण्याचा वेग काहीसा मंदावला होता. राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी त्यावेळी घेतलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत वीजमीटरचा तुटवडा संपविण्याचे व नवीन वीजजोडण्यांचा वेग वाढविण्याचे आदेश दिले होते. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनीही क्षेत्रीय कार्यालयांना वर्षभर मुबलक व सातत्याने वीजमीटर उपलब्ध होईल यासाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्याचा धडक निर्णय घेतला. त्याप्रमाणेनिविदाअंतर्गत पुरवठादारांना गेल्या मार्च महिन्यापासून सिंगल फेजचे १८ लाख तर थ्री फेजचे १ लाख ७० हजार नवीन वीजमीटरच्या पुरवठ्याचे कार्यादेश यापूर्वीच देण्यात आले आहेत.

या धडक उपाययोजनेमुळे कोरोना काळातील वीजमीटरचा तुटवडा गेल्या पाच महिन्यांपासून संपुष्टात आला आहे. सोबतच उच्च व लघुदाबाच्या नवीन वीजजोडण्यांचा वेगही वाढला आहे. गेल्या मार्च २०२१पासून पुरवठादारांकडून नवीन वीजमीटर उपलब्ध होण्यास सुरवात झाली आहे. आतापर्यंत सिंगल फेजचे १५ लाख ६६ हजार तर थ्री फेजचे १ लाख १० हजार नवीन मीटर मुख्यालयातून क्षेत्रीय कार्यालयांना पाठविण्यात आले आहेत. यामध्ये (कंसात थ्री फेज) पुणे प्रादेशिक कार्यालय- सिंगल फेज ४ लाख ६२ हजार (३९,१०३), कोकण- सिंगल फेज ५ लाख ४५ हजार (३७,७८७), नागपूर- २ लाख ९५ हजार (२२,८६०) आणि औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयास सिंगल फेजचे १ लाख ६४ हजार व थ्री फेजचे १०,२५० नवीन वीजमीटर पाठविण्यात आलेले आहेत. संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी देखील सर्व क्षेत्रीय कार्यालयांना आवश्यकतेनेनुसार मीटर उपलब्ध करून देण्यासाठी विशेष लक्ष दिले.

वीजमीटर उपलब्ध झाल्यानंतर महावितरणकडून नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यास मोठा वेग देण्यात आला आहे. वर्षभरात महावितरणकडून साधारणतः ८ ते ९ लाख नवीन वीजजोडण्या देण्यात येतात. मात्र गेल्या मार्च ते जुलै २०२१च्या कालावधीत उच्चदाबाच्या ४३५ आणि लघुदाबाच्या ५ लाख १८ हजार १४२ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्याची कामगिरी महावितरणने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या नेतृत्वात केली आहे. लघु व उच्चदाब वर्गवारीमध्ये सर्वाधिक घरगुती- ३ लाख ८९ हजार ४७, वाणिज्यिक- ५९ हजार ९६९, औद्योगिक- १० हजार ९६३, कृषी- ५० हजार १७८, पाणीपुरवठा व पथदिवे- ७४२ व इतर ७२४३ अशा एकूण ५ लाख १८ हजार १४२ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. यासोबतच ग्राहकांच्या तक्रारीनुसार किंवा तपासणीमध्ये सदोष आढळून आलेले वीजमीटर देखील तातडीने बदलण्याची कार्यवाही सुरु आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

निफाड – कुंदे, जाधव यांची सरकारी कामात अडथळा व विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

Next Post

इंपिरिकल डाटा संदर्भात केंद्र सरकारने मागितला तीन आठवड्यांचा वेळ; भुजबळ यांची माहिती

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
bhujwal

इंपिरिकल डाटा संदर्भात केंद्र सरकारने मागितला तीन आठवड्यांचा वेळ; भुजबळ यांची माहिती

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011