नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ अंतर्गत असलेल्या इंदिरा नगर कक्षाच्या अंतर्गत येणाऱ्या असलेल्या ग्राहकांना योग्य दाब तसेच उच्चतम सेवेसाठी ३३/११ केव्ही शिवाजी वाडी (इंदिरानगर) विद्युत उपकेंद्र येथे जास्त क्षमतेचे रोहित्र बसविण्यात येणार असल्याने शनिवारी (दि. १३ सप्टेंबर) रोजी सकाळी ०८ ते संध्याकाळी ०५ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद असणार आहे. तरी ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
यादरम्यान ११ केव्ही भारत नगर वाहिनीवरील भारत नगर,शिवाजीवाडी, रहेनुमा नगर,अशोका मार्ग,ममता नगर,जयदीप नगर,चीस्तीया कॉलनी, कॉलेज रोड,खोडे नगर,रहेमत नगर, गणेश नगर,आठवण हॉटेल रोड,वडाळा गाव,मिल्लत नगर आणि अजमेरी कॉलोनी. ११के.व्ही. दिपाली नगर वाहिनीवरील दिपाली नगर,विनय नगर,गणपती मंदिर,पूर्ती सोसायटी,सुचिता नगर,काळे मळा,श्रीराम नगर, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक,परब नगर, बापु बंगला,आत्मविश्वास सोसायटी, रथचक्र, राजसारथी, शर्मा मंगल कार्यालय,वंदना पार्क,साईनाथ नगर, डी मार्ट,अशोका हॉस्पिटल रोड आणि फ्रेशअप बेकरी.
११के.व्ही.शनी मंदिर वाहिनीवरील शनी मंदिर,छान हॉटेल, सुचिता नगर,आदर्श कॉलोनी,महिला बँक, कमोद नगर, प्रसन्न कॉलनी, तपस्वी हॉटेल,मामाचा ढाबा,गीतांजली कॉलनी, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक ,पाटील गार्डन,रथचक्र चौक आणि चार्वाक चौक.
११के.व्ही.कल्पतरू नगर वाहिनी :- अशोका मार्ग,ICAI भवन,मातोश्री कॉलनी,निसर्ग कॉलनी,खोडे नगर,गोदावरी नगर,रवि शंकर मार्ग,पखाल रोड,क्युरी मानवता हॉस्पिटल आणि अशोका हॉस्पिटल.
रोहित्र क्षमता वाढ करण्याचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वीज पुरवठा सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या शहर विभाग २ कडून करण्यात आले आहे.