शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राज्यातील वीज ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जानिर्मितीत ओलांडला १००० मेगावॅटचा टप्पा…

ऑगस्ट 13, 2025 | 5:43 pm
in संमिश्र वार्ता
0
solar e1703396140989

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने यशस्वी कामगिरी केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला या योजनेच्या अंतर्गत घरगुती ग्राहकांच्या छतावरील सौर ऊर्जानिर्मिती क्षमतेने एक हजार मेगावॅटचा टप्पा ओलांडला. या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी वीज ग्राहकांचे, महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तसेच छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविणाऱ्या पुरवठादारांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी सुरू केलेल्या या योजनेचा घरगुती ग्राहकांना थेट लाभ असल्याने योजनेच्या अंमलबजावणीवर भर देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महावितरण राज्यात या योजनेची अंमलबजावणी करत आहे. केंद्र सरकारने फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू केलेल्या या योजनेत गेल्या दीड वर्षात छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविणाऱ्या राज्यातील ग्राहकांची संख्या अडीच लाखापेक्षा अधिक झाली असून त्यांची एकत्रित क्षमता १,००० मेगावॅट अर्थात एक गिगावॅट झाली आहे. या ग्राहकांना केंद्र सरकारकडून १८७० कोटी रुपये अनुदान मंजूर झाले.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र हे आघाडीचे राज्य ठरले आहे. योजनेच्या अंमलबजावणीत ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डिकर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. १५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिनी देशभर सौर ऊर्जेच्या वापराबाबत जागृती करण्यात येणार असून त्याच वेळी राज्यातील वीज ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जानिर्मितीच्या बाबतीत एक हजार मेगावॅटचा टप्पा ओलांडला आहे.

छतावर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्याच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत राज्यात नागपूर जिल्ह्याने ४०,१५२ लाभार्थी ग्राहक आणि १५७ मेगावॅट क्षमतेसह प्रथम क्रमांक मिळविला आहे. नागपूर जिल्ह्यापाठोपाठ पुणे (१९,१९५ ग्राहक व ८९ मेगावॅट क्षमता), जळगाव (१८,८९२ ग्राहक व ७० मेगावॅट क्षमता), अमरावती (१५,२४५ ग्राहक व ६३ मेगावॅट क्षमता), छत्रपती संभाजीनगर (१६,६६४ ग्राहक, ५९ मेगावॅट क्षमता) व *नाशिक (१५,४६८ ग्राहक, ५५ मेगावॅट क्षमता) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.

योजनेचा असा लाभ घ्या
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांनी राज्यात एक हजार मेगावॅट क्षमतेचा टप्पा ओलांडला असून अन्य घरगुती वीज ग्राहकांनी आणि गृहनिर्माण संस्थांनीही या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.

योजनेचा लाभ घेण्यासाठी https://pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ग्राहक महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधू शकतात.

छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून ग्राहकांना थेट अनुदान मिळते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला तीस हजार रुपये, दोन किलोवॅटला साठ हजार रुपये तर तीन किलोवॅटला ७८ हजार रुपये अनुदान मिळते. गृहनिर्माण संस्थांनाही पाचशे किलोवॅटपर्यंत प्रती किलोवॅट १८ हजार रुपये अनुदान मिळते. छतावर बसविलेल्या सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पातून पुढे २५ वर्षे वीजनिर्मिती होते. या वीजनिर्मितीमुळे ग्राहकाची घरगुती गरज पूर्ण होते व अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सोनिया गांधी भारतीय नागरिक नसतांनाही मतदार होत्या…भाजपचा पलटवार

Next Post

नाशिक जिल्हा परिषदेत स्वातंत्र्यदिनी प्रतीक्षा यादीतील इतक्या उमेदवारांना मिळणार नियुक्ती आदेश

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
IMG 20250130 WA0334 3

नाशिक जिल्हा परिषदेत स्वातंत्र्यदिनी प्रतीक्षा यादीतील इतक्या उमेदवारांना मिळणार नियुक्ती आदेश

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011