शनिवार, जून 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना दुसरा लकी ड्रॉ या तारखेला

by India Darpan
मे 2, 2025 | 5:53 pm
in संमिश्र वार्ता
0
mahavitarn

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेचा दुसरा लकी ड्रॉ ऑनलाईन पध्दतीने दि. ७ मे २०२५ रोजी काढण्यात येणार आहे. यातून प्रत्येक उपविभाग स्तरावर एक प्रमाणे पहिल्या क्रमांकाकरिता ६५१ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन बक्षिस म्हणून दिला जाणार आहे. तर प्रत्येक उपविभागात प्रत्येकी दोन प्रमाणे दुसऱ्या क्रमांकासाठी १३०२ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन व प्रत्येकी दोन प्रमाणे तिसऱ्या क्रमांकासाठी १३०२ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट वॉच बक्षिस म्हणून दिले जाणार आहे. पहिला लकी ड्रॉ दि. ७ एप्रिल २०२५ रोजी काढण्यात आला असून विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले आहे. यापुढील लकी ड्रॉ जून २०२५ या महिन्यात काढण्यात येणार आहेत.

महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन वा तीन पेक्षा अधिक वीज बिले भरणाऱ्या ग्राहकांना या संधीचा फायदा होणार आहे.

ही योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू (एल टी- लाईव्ह) वीजग्राहकांसाठी लागू असून, ज्यांनी ०१ एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे ०१.०४.२०२३ ते ३१.०३.२०२४ या कालावधीत एकदाही वीज देयकाचा ऑनलाईन भरणा केलेला नाही किंवा ऑनलाईन वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नाही. अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळास www.mahadiscom.in भेट द्यावी.

ग्राहक रांगेत उभे राहण्यापेक्षा वेळ, श्रम व पैशांची बचत करीत डिजिटल पध्दतीने वीज बिल भरणा करण्यास प्राधान्य देत आहेत. ग्राहकांना डिजिटल पध्दतीने वीज बिलाचा भरणा करता यावा, यासाठी महावितरणकडून संकेतस्थळ, महावितरण मोबाईल ॲपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. ग्राहकांना देय रक्कमेवर ०.२५ टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते. परिणामी सध्या राज्यात ७० टक्के हून अधिक वीज ग्राहक ऑनलाईन पध्दतीने वीज बिलाचा भरणा करीत आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी लकी डिजिटल ग्राहक योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेच्या कालावधीत ग्राहकाने नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस इ. ऑनलाईन वीज बिल भरणा पर्याय वापरून लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर दरमहा एकप्रमाणे सलग तीन किंवा तीन पेक्षा जास्त महिने वीज बिल भरणे आवश्यक राहील. अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळास www.mahadiscom.in भेट द्यावी.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुणे ते जोधपूर या तारखेपासून नवीन एक्‍सप्रेस गाडी…असा आहे रेल्वेमार्ग

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आठ हजार कोटींचे सामंजस्य करार…

Next Post
DEVENDRA

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आठ हजार कोटींचे सामंजस्य करार…

ताज्या बातम्या

cbi

NEET च्या विद्यार्थ्यांना फसवल्याप्रकरणी CBI ने दोन खाजगी व्यक्तींना केली अटक…

जून 14, 2025
202506143427942

नीट युजीचा निकाल जाहीर, राजस्थानचा महेश कुमार ६८६ गुणांसह अव्वल तर महाराष्ट्राचा हा विद्यार्थी तिसरा

जून 14, 2025
IMG 20250614 WA0223

पुणे शहर पोलीसांचे आता ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’…वाहतूक कोंडी सोडवण्यासह या गोष्टींसाठी उपयोगी

जून 14, 2025
crime1

रिक्षा प्रवासात सह प्रवासी महिलांनी वृध्देच्या पाकिटातील १ लाख ४ हजाराचे दागिणे केले लंपास

जून 14, 2025
crime 88

घरफोडीचे सत्र सुरूच…चार घडफोडीमध्ये चोरट्यांनी सव्वा सात लाखाचा ऐवज केला लंपास

जून 14, 2025
jilha parishad

मालेगाव, सुरगाणा, चांदवडलाच का वाढले एकेक गट…जाणून घेऊया, कशी करतात गट संख्या निश्चिती

जून 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011