शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल…इतक्या मासिक हप्त्यांची सोय

by Gautam Sancheti
एप्रिल 24, 2025 | 3:25 pm
in स्थानिक बातम्या
0
mahavitarn


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)
– महावितरणच्या नाशिक परिमंडलातील वीजग्राहकांना माहे एप्रिल/मे महिन्याच्या वीजबिलांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्यास महावितरणकडून जास्तीत जास्त सहा समान मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याबाबतचा संदेश सुरक्षा ठेवीच्या बिलावर नमूद करण्यात आला आहे. या अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या रकमेचा वीजग्राहकांना भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता 2021 च्या विनियम 13.1 नुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. वीजग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद आयोगाकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विनियम 13.11 नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दराच्या सममूल्य दराने व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून वीजग्राहकांना अदा करण्यात येते.

त्याप्रमाणे नाशिक परिमंडल अंतर्गत येणाऱ्या नाशिक, मालेगांव व अहिल्यानगर मंडळातील वीजग्राहकांना एप्रिल महिन्यामध्ये अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. या बिलामध्ये नमूद सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्यासाठी जास्तीत जास्त सहा मासिक समान हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासंबंधीची माहिती सुरक्षा ठेवीच्या बिलामध्ये नमूद आहे. तसेच लघुदाब वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम घरबसल्या भरण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in ही वेबसाईट व महावितरण मोबाईल ॲपद्वारे सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या बिलाची रक्कम भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बागलाण तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक ८ हजार रुपयाची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

Next Post

नरेडको नाशिकच्या कार्यकारिणी समितीची महत्त्वपूर्ण बैठक…विविध धोरणात्मक विषयांवर चर्चा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20250424 WA0250 1

नरेडको नाशिकच्या कार्यकारिणी समितीची महत्त्वपूर्ण बैठक…विविध धोरणात्मक विषयांवर चर्चा

ताज्या बातम्या

Sushma Andhare

देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा मागण्याचा खरंच नैतिक अधिकार आहे का? उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरुन सुषमा अंधारे यांचा सवाल

ऑगस्ट 22, 2025
SUPRIME COURT 1

सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांसंदर्भात दिले हे निर्देश…

ऑगस्ट 22, 2025
crime1

फुड कॅफेमध्ये काम करणा-या नोकराने गल्यातील रोकडसह मोबाईलवर मारला डल्ला

ऑगस्ट 22, 2025
crime 88

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात तीन घरफोडी….चोरट्यानी सव्वा सहा लाखाचा ऐवज केला लंपास

ऑगस्ट 22, 2025
cbi

सीबीआयने रेल्वे पार्सल क्लर्कला लाच घेताना केली अटक…

ऑगस्ट 22, 2025
Gy3nWP8WwAAiwvz e1755850108280

ऑनलाईन गेमिंग प्रचार प्रसार आणि नियमन विधेयकाचे ​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले स्वागत…

ऑगस्ट 22, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011